एकेकाळी काटकुळी म्हणून चिडवायचे ती आता झाली ‘मसल बार्बी’

body
सेऊल – दक्षिण कोरियातील एक तरुणीला लोक तिच्या शरीरयष्टिवरुन खुप काही बोलायचे, तिच तरुणी आज ‘मसल बार्बी’म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
body1
त्या ३४ वर्षीय तरुणीचे नाव यियोन-वू असे असून ती शरीराने दिसायला काटक व मजबूत; परंतु मनाने अतिशय कोमल म्हणून तिला नागरिक ‘मसल बार्बी’ म्हणतात. अनेक आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग यियोनने स्पर्धा जिंकल्या असून, ती तिच्या वयाच्या तरुणींसाठी आदर्श बनली आहे.

यियोनला इंटरनेट सेलेब्रिटीही म्हटले जाते. कारण तिचे इन्स्टाग्रामवर एक लाख ३७ हजार फॉलोअर्स आहेत. यिओनला कधीकाळी लोकांसमोर जायला भीती वाटायची. कारण तेव्हा ती अंगकाठीने खूपच बारीक असल्यामुळे ती निराश असायची; परंतु एके दिवशी तिने निराशा झटकून व्यायाम करून स्वत:ला बदलायचे ठरवले आणि आज ती यशस्वी बॉडी बिल्डर आहे.

Leave a Comment