श्रेयस आणि आफताबच्या ‘सेटर्स’चा ट्रेलर रिलीज

setters
प्रत्येक तरुणाचे एखाद्या चांगल्या विद्यापीठातून शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. चांगले शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याचे एका मध्यमवर्गीय तरुणासमोर ध्येय असते. पण हे स्वप्न पाहणे जेवढे सोपे आहे, तितकच कठिण ते सत्यात उतरवणे असते आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा त्यानंतर आटापीटा सुरु होतो. कोणताही मार्ग त्यासाठी अवलंबावा लागला तरीही हे तरुण मागेपुढे पाहत नाहीत. बॉलिवूडमध्ये अशाच आशयाचा चित्रपट होऊ घातला आहे. या चित्रपटाचे नाव ‘सेटर्स’ असे आहे.

श्रेयस तळपदे, आफताब शिवदासनी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी चौधरी हे करत आहेत. या चित्रपटात शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे भ्रष्टाचार निर्माण होतो, यावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा वाराणसी, मुंबई, जयपूर आणि दिल्लीसारख्या ठिकाणावर आधारित आहे. या चित्रपटात इशिता दत्ता, सोनाली सेहगल, विजय राज, पवन मल्होत्रा यांचीदेखील मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment