रोहित शर्मा आपल्या चिमुकलीला शिकवत आहे स्पॅनिश भाषा

rohit-sharma
दुखापतीमुळे पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खेळू शकला नाही. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रोहितची ३ महिन्याची मुलगी या व्हिडिओत हसत आहे. रोहित त्याच्या मुलीला या व्हिडिओत स्पॅनिश शिकवत आहे.

View this post on Instagram

Spanish lessons at 3months #muybien

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on


व्हिडिओ शेअर करताना त्याने असे कॅप्शन लिहिले आहे की, स्पॅनिश लेसन अॅट थर्ड मंथ. मुय बिन. शेवटी त्याने लिहिले की, मुय बिन. त्याचा अर्थ खूपच छान. अनेकजण रोहितच्या या व्हिडिओला लाईक करत आहेत. मंगळवारी रोहितला अवघड ठिकाणी दुखापत झाली होती. त्याला त्यानंतर फिजियो नितिन पटेल यांनी उपचारासाठी ड्रेसिंग रुममध्ये घेऊन गेले. तो त्यामुळे सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर संघाचे नेतृत्व पोलार्डने केले. रोहितच्या जागी सिद्धेश लाडला खेळण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकात मुंबईने पंजाबवर रोमांचक विजय मिळविला.

Leave a Comment