मुस्लिम मते मला मिळाली नाहीत तर त्यांचा विचार मलाही करता येणार नाही – मनेका गांधी

maneka-gandhi
नवी दिल्ली – मनेका गांधी यांनी सुलतानपूर येथील मुस्लिमांना मला मतदान करा अन्यथा, जेव्हा नोकरी मागण्यासाठी माझ्याकडे याल तेव्हा मी तुमचा विचार करणार नसल्याचे सांगितले आहे. 100 टक्के मी जिंकून येणार याची मला शाश्वती आहे, मला तुम्ही मत द्या अथवा देऊ नका, पण मत दिले नाही तर तुम्हाला माझी गरज जेव्हा लागेल मलाही तेव्हा विचार करावा लागेल असे म्हणत मनेका गांधी यांनी सुलतानपूर येथील मुस्लिमांना इशारा दिला आहे.


मी 100 टक्के जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, मला लोकांची मदत होते आहे. पण मुस्लिम मतांशिवाय माझा विजय झाला तर मला फार काही चांगले वाटणार नाही. मी कुठेतरी खट्टू होईन. मुस्लिम बांधव जेव्हा माझ्या दारात मदत मागायला येतील तेव्हा मलाही त्यांचा विचार करावा लागेल आणि माझ्या मनात ही गोष्ट येईलच की त्यांनी मला मत दिले नाही. आम्ही काय गांधीजींची ती लेकरे नाही जी फक्त फक्त वाटत बसू आणि मतदानात मार खात राहू. फक्त नोकरीच नाही तर कोणतेही काम असले तरीही तिथे व्यवहार हा आलाच.

Leave a Comment