विद्या बालन साकारणार इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा

vidya-balan
बॉलीवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनविण्याचे फॅड रुजु झाले आहे. बाळासाहेब ठाकरे, मनमोहन सिंह यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यवर आधारित चित्रपटांची निर्मिती झाल्यानंतर आता आणखी एका राजकीय व्यक्तिच्या आयुष्यावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला येणार आहे. पण चित्रपटाच्या माध्यमातून नाही तर वेबसिरीजच्या माध्यमातून येणार आहे. गेल्या ब-याच दिवसांपासून भारताच्या आयर्न लेडी आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित वेब सिरीज येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. विद्या बालन इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. पण याबाबत विद्याकडून कोणत्याच प्रकारचे संकेत मिळाले नव्हते.

त्यातच आता मिळालेल्या माहिती नुसार सध्या विद्याला परफेक्ट लूक देण्याची तयारी प्रोडक्शन टीम करत आहे. परफेक्ट लूकसाठी प्रोस्थेटिक मेकअप वापरण्याची शक्यता आहे. इंदिराजींची अनेक छायाचित्रे पाहून त्यांचे पोशाख लक्षात घेऊन फॅशन डिझायनर पोशाख तयार करतील. विद्याही या भूमिकेसाठी स्वतःला तयार करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत मेहनत घेत आहे. बायोपिक चित्रपटातील ही भूमिका खरच खूप आव्हानात्मक असल्याचे मी मानते. सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन असे विद्याने म्हटले आहे.

१९७५मधील आणीबाणीचे कारण, मुलगा संजय गांधीसोबत झालेले मतभेद, राजकीय मतभेद , राजकारणातील डावपेच अशा वेगवेगळ्या गोष्टी या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहेत. सागरिका घोष यांचे पुस्तक ‘इंदिरा: इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर’वर आधारित ही वेबसिरीज असणार आहे.

Leave a Comment