लवकरच ‘छपाक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री दीपिका पादुकोण येणार आहे. ती या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा एक फोटो काही दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आला होता. आता यापाठोपाठ चित्रपटातील एक व्हिडिओही समोर आला आहे.
दीपिकाचा ‘छपाक’च्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल
दीपिका या व्हिडिओमध्ये विक्रांत मेस्सीसोबत दिसत आहे. बाईकवर दोघेही स्पॉट झाले आहेत. या चित्रपटात विक्रांत लक्ष्मीच्या पतीची भूमिका साकारणार आहे. तिला या भूमिकेत पाहण्यासाठी दीपिकाचे चाहते उत्सुक आहेत. दीपिकासाठी एका अॅसिड हल्यातील पीडित मुलीची भूमिका साकारणे नक्कीच आव्हानात्मक आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत असून त्यांनी यापूर्वी ‘राजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला अलिकडेच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. छपाक हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.