पोलार्डकडून पत्नीला वाढदिवसाची अनोखी भेट

Kieron-Pollard
मुंबईने वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबचा तीन विकेटने पराभव केला. किरॉन पोलार्डने या विजयात कर्णधाराला साजेशी विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पोलार्डने या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हा विजय पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून समर्पित केला. पोलार्डच्या चेहऱ्यावर सामन्यानंतर आनंद दिसत होता.


पोलार्डने पंजाबविरोधात ३१ चेंडूत दहा षटकारांसह ८३ धावांची स्फोटक खेळी केली. पोलार्डच्या पत्नीचा काल बुधवारी वाढदिवस होता. पोलार्डने त्याच दिवशी स्फोटक खेळी केली. पण सामना पाहण्यासाठी पत्नी उपस्थित नव्हती. पोलार्डने अशातच विजय मिळवत पत्नीला विजयाचे अनोखे गिफ्ट दिले आहे. पोलार्डने सामन्यानंतर मुलासोबत बोलताना याचा खुलासा केला. पोलार्डची पत्नी जीना गर्भवती असल्यामुळे सामना पाहण्यासाठी भारतात आलेली नाही. सामना सुरू होण्यापूर्वी पोलार्डने इन्स्टाग्रामवरून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Leave a Comment