शरद पवारांच्या भेटीला रंगीला गर्ल

urmila-matondkar
मुंबई – नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भेट घेतली आहे. उर्मिला मातोंडकर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अनेकांच्या गाठीभेटी करत आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांमध्ये लोकसभा निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर या लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तर या जागेवरून युतीचे गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहेत. गोपाळ शेट्टी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय निरूपम यांचा पराभव केला होता. शेट्टी यांच्या विरोधात यावेळी काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होईल अशी चिन्ह आहेत.

Leave a Comment