VIDEO : या जिम्नॅस्टिक्सचे करिअर संपुष्टात… पण का?

gymnast
जगातील सर्वात खतरनाक खेळ जिम्नॅस्टिक्सची ओळख आहे. कारण या खेळात खेळाडूला दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. नुकतेच अभियांत्रिकीची विद्यार्थीनी असलेली अमेरिकन जिम्नास्ट सॅम सिरीओ हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचे जिम्नॅस्टिक्समधील करिअर संपुष्टात आले आहे.

जिम्नॅस्टिक्स करत असताना फ्लोअर रूटिनवर अमेरिकन जिम्नास्ट सॅम हिचा पाय घसरला आणि ती कोसळली. तिच्या दोन्ही पायांना यात गंभीर दुखापत झाली आहे. हँडस्प्रिंग डबल फ्रंट फिल्पसाठी एक अॅथलिट गेल्यानंतर सॅम हिची वेळ आली होती. जिम्नॅस्टिक्स करायला ती मॅटवर गेली आणि त्याच क्षणी तिचा पाय घसरला ती तिथेच कोसळली. तिच्या दोन्ही पायाला त्यात दुखापत झाली आहे. तिचे दोन्ही पाय त्यात निकामी झाले.

(व्हिडीओ सौजन्य – द सन)
तिच्या दुखापतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर तडकाफडकी सॅम सिरीओने तिच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट करून आपण जिम्नॅस्टिक्समधून निवृत्त होत असल्याचे तिने सांगितले.

आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सॅम हिने लिहिले की, शुक्रवारची रात्र ही जिम्नास्ट म्हणून माझी शेवटची रात्र होती. मी माझ्या ग्रीप्सला १८ वर्षानंतर लटकवत आहे आणि माझे चाक मागे सोडून जात आहे. मी त्या व्यक्तिचा विचार करू शकत नाही त्या व्यक्तिबद्दल संवेदनशील होऊ शकत नाही ज्याने मला जिम्नास्ट बनवले. मला कठिण परिश्रम करायला ज्याने शिकवले. नम्रता, प्रामाणिकपणा आणि समर्पण, ही तर फक्त काही नावे आहेत.

Leave a Comment