‘ब्लॅक पिंक’ने तोडला गंगम स्टाईलचा रेकॉर्ड

blackpink
सध्याच्या घडीला सोशल मीडियावर दक्षिण कोरियातील पॉप बँड ‘ब्लॅकपिंक’ हा चर्चेत आला असून या पॉप बँडला सर्वात कमी कालावधीत युट्युबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाले असल्यामुळे सध्याच्या घडीला युट्यूबवर हो आघाडीचा बँड ठरला आहे. सोशल मीडियावर या बँडचे ‘किल धीस लव्ह’ हे गाणे धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या गाण्याला युट्युबवर १३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

४ एप्रिलला हे गाणे रिलीज करण्यात आले होते. या गाण्याला पहिल्या २४ तासांत साडेपाच कोटी व्ह्यूज मिळाल्यामुळे सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा पहायला मिळत आहे. ‘ब्लॅकपिंक’च्या ‘किल धीस लव्ह’ या गाण्याने काही वर्षांपूर्वी प्रचंड व्हायरल झालेल्या ‘गंगम स्टाईल’ या गाण्याचा रेकॉर्डही मोडला. यापूर्वी अरियाना ग्रांदेच्या थँक्यू, नेक्स्ट या गाण्याला कमी वेळात सर्वाधिक व्ह्यूज मिळाले होते. २४ तासांत या गाण्याला ५. ५४ कोटी व्ह्यूज मिळाले होते.

अमेरिकन पॉप स्टारची सर्वाधिक चलती अनेकदा युट्युबच्या यादीत पाहायला मिळते. पण सर्वांनाच दक्षिण कोरियातील चार मुलींच्या या बँडने मागे टाकले आहे. ‘ब्लॅकपिंक’ बँड सोशल मीडियावर २०१६ मध्ये चर्चेत येण्यास सुरुवात झाली. या बँडच्या जिसू, जेनी, लिसा आणि रोझ मुख्य सदस्य आहेत. या बँडने त्यांचा पहिला अल्बम २०१६ मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. ज्याला कोरियामध्ये बरीच लोकप्रियता मिळाली होती.

Leave a Comment