‘ताश्कंद फाईल’मधील पहिलेवहिले गाणे तुमच्या भेटीला

tashkent
आगामी ‘ताश्कंद फाईल’ या चित्रपटामध्ये भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूमागील काही तपशील पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा ट्रेलर आला होता. नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.

‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणे देशभक्तीपर आधारित गाणे आहे आपल्याला माहितच आहे. आता ‘ताश्कंद फाईल’मध्येही हेच गाणे पाहायला मिळणार आहे. पण या गाण्याचा यावेळीचा रिदम हटके पद्धतीचा असणार आहे. अनेक चित्रपटांमध्ये सध्या रॅप गाण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. या गाण्यासाठीही हाच ट्रेण्ड वापरण्यात आला आहे. ‘सारे जहाँ से अच्छा’ गाण्याची जुनी चाल आणि त्यानंतर लगेचच रॅपचा रिदम या गाण्यात ऐकायला मिळतो.

हे रॅप गाणे जयराम मोहन, आर्य आचार्य, आरजे अनुराग, आरजे रोहिणी आणि इतर कलाकारांनी गायले आहे. तर, हे गाणे विवेक अग्निहोत्री, रोहित शर्मा यांनी लिहिले आहे. तसेच या गाण्यातून देशातील राजकारण, जनतेचे प्रश्न आणि इतरही अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या गाण्याची सध्या चर्चा सुरु आहे. मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, श्वेता बासू, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी आणि विनय पाठक अशी स्टारकास्ट ‘ताश्कंद फाईल्स’मध्ये दिसणार आहे.

Leave a Comment