शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टिझर रिलीज !

kabir-sing
नुकताच बहुचर्चित ‘कबीर सिंह’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक असून बॉक्स ऑफिसवर ‘अर्जुन रेड्डी’ने तुफान गर्दी खेचली होती. अर्जुन रेड्डी हा यशस्वी मेडिकल सर्जन असतो. पण त्याच्या प्रियसीचे जेव्हा लग्न बळजबरीने तिच्या मनाविरुध्द लावले जाणार असते हा डॉक्टर तेव्हा आक्रमक होतो. त्याच्या बिनधास्तपणाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटात कबीर सिंहची भूमिका शहिद कपूर साकारतो आहे तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत कियारा अडवाणी आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, मुराद खेतानी, क्रिशन कुमार आणि अश्विन वर्दे यांनी केली आहे. ‘कबीर सिंह’ या हिंदी रिमेकचेही दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’चे दिग्दर्शन केलेल्या संदिप रेड्डी वन्गा यांनी केले असून हा चित्रपट २१ जून रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment