आईचे पाय भाजू नये म्हणून उदयनराजेंनी दिली स्वत: चप्पल !

udyanaraje-bhosale
सातारा: जन्मदात्या आईचे आपल्या आयुष्यात देवापेक्षा मोठे स्थान असते, हे काही आपल्याला सांगायला नको. आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी सर्वात आधी आईच आपल्या समोर उभी राहते आणि संकटाचा सामना करते. अशा माउलीचे ऋण आपल्याला कधीही फेडता येणार नाही. मुलाच्या वेदना जशा आईला कळतात तशाच आईच्या वेदनाही मुलाला कळतातच आणि कसलाही त्रास आपल्या आईला होऊ नये, यासाठी मुलाची हवे ते करण्याची तयारी असते. याचा प्रत्यय छत्रपती उदयनराजे यांच्या रुपाने आला.

उदयनराजेंच्या छत्रपती कल्पनाराजे भोसले या मातोश्री असून सध्या त्यादेखील आपल्या मुलाच्या प्रचारात हिरीरीने भाग घेत आहेत. उदयनराजेंचा अर्ज भरण्याची याचदरम्यान रॅली निघाली होती. यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रॅली आल्यानंतर, जेव्हा पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आईसाहेब गेल्या, तेव्हा त्यांचे पाय भाजतील हे उदयनराजेंच्या लगेच लक्षात आले. त्यांनी त्यावेळी ताबडतोब आपल्या मातोश्रींच्या चप्पल स्व:त उचलून त्यांना घालण्यासाठी दिल्या. या वेळचा हा मायेचा हा प्रसंग पाहून राजेंच्या मातृप्रेमाची चर्चा साताऱ्यात रंगली होती.

23 एप्रिलला सातारा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. राष्ट्रवादीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेत दाखल झालेले नरेंद्र पाटील यांच्यात लढत होत आहे. 23 मे रोजी लोकसभेच्या निकालावेळी या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याचा निकाल समजेल.

Leave a Comment