नवी दिल्ली – उद्या म्हणजे 7 तारखेला भारतीय जनता पक्षाचा ‘निवडणूक जाहीरनामा’ सादर केला जाऊ शकतो. याला 2019 ‘संकल्प पत्र’ असे नाव देण्यात आले आहे. भाजपने 2014 मध्येही याच तारखेला जाहीरनामा सादर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच यांच्यासह 20 जणांच्या जाहीरनामा समितीतील काही केंद्रीय मंत्रीही यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्या सादर होऊ शकतो भाजपचा जाहीरनामा
या समितीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, पियूष गोयल, अरुण जेटली, मुख्तार अब्बास नक्वी आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचाही सहभाग होता. तब्बल 10 कोटी लोकांकडून पक्षाने यासाठी सूचना मागवल्या होत्या. 15 उपसमित्या यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. भाजपने 2014 मध्ये नऊ टप्प्यांतील निवडणुकांसाठी 7 एप्रिललाच जाहीनामा सादर केला होता. निवडणूक आयोगाने या वेळेस कोणताही पक्ष निवडणुकीआधी 48 तासांमध्ये कसलाही जाहीरनामा सादर करणार नाही, असा आदेश जारी केला आहे. ७ टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिलला सुरू होणार आहेत.