नवी दिल्ली – देशातील सर्वच राजकीय पक्ष सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुकांच्या जाहीरातीसाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून भाजपने गुगलवरुन जाहीरात करण्यासाठी सर्वात जास्त पैसे मोजले असल्याचे आपल्या अहवालात गुगलने प्रसिद्ध केले आहे. तर, गुगल माध्यमाचा दक्षिण भारतातील काही पक्षांनीही मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे समोर आले आहे.
गुगलवर जाहीरात करण्यात भाजप आघाडीवर
फारच कमी कालावधी लोकसभा निवडणुकांना उरलेला आहे. राजकीय पक्ष त्या पार्श्वभूमीवर विविध समाज माध्यमांचा वापर करत आहेत. हे पक्ष जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. भाजप त्यामध्ये आघाडीवर आहे. भाजपने यावर प्रचारासाठी तब्बल १ कोटी २१ लाख ४८ हजार ६०० रुपये खर्च केले आहेत. मैं भी चौकीदार या मोहिमेवर यामध्ये त्यांनी सर्वात जास्त खर्च केल्याचे गुगल सांगत आहे.
देशातील ११ पक्ष गुगल माध्यमाचा प्रचारासाठी वापर करणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. काँग्रेस त्यामध्ये सहाव्या स्थानावर आहे. आत्तापर्यंत ५४ हजार १०० रुपये काँग्रेसने खर्च केले आहे. तर, गुगलवर खर्च करणाऱ्यांमध्ये आंध्रप्रदेशचा वायएसआर काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. १ कोटी ४ लाख ३४ हजार ५०० रुपये वायएसआर काँग्रेस पक्षाने खर्च केले आहे. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी जुळलेल्या परमान्य स्ट्रॅटेजी कन्सल्टिंग प्राईवेट कंपनने खर्च केला आहे.