प्रकाश आंबेडकर यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

prakash-amabedkar
मुंबई – सध्या आपल्या वक्तव्यांमुळे वंचिन बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर चर्चेत असून त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचा सर्वात मोठे ब्लॅकमेलर असा उल्लेख केला आहे. भाजपने सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यासाठी त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्याचबरोबर कोणासोबत काँग्रेसने आघाडी करु नये यासाठी भाजपनेच खोडा घातल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर असून सोनिया गांधींसह अनेकांना ब्लॅकमेल करत असतात असा आरोप केला आहे. तुम्ही कोणासोबतही आघाडी तुमच्या जावयाला जेलमध्ये जायचे नसेल तर करु नका अशी अट नरेंद्र मोदींनी काँग्रेससमोर ठेवली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्ष तयार असतानाही आघाडी झाली नसल्याचा आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचबरोबर पुण्यातील एका भ्रष्टाचारी नेत्याशी शीला दीक्षित यांचे संबंध असल्याचा आऱोपही त्यांनी केला.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच तुरुंगात टाकू, असे वक्तव्य केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत दाखविणे, धमकी देणे या गुन्ह्य़ासाठी फौजदारी दंडसंहितेच्या कलम ५०३, ५०६ नुसार आणि १८९नुसार आंबेडकर यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालही मागविला होता.

Leave a Comment