या मंदिरांमध्ये पुरुषांना नाही प्रवेश

temple
भारतामध्ये अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत, जिथे प्रवेश करण्याची अनुमती महिलांना नाही. पण त्याचबरोबर भारतामध्ये काही धर्मस्थळे अशीही आहेत जिथे प्रवेश करण्याची परवानगी पुरुष मंडळींना नाही. या मंदिरांमध्ये प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार केवळ महिलांना दिला गेला आहे. केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे असलेल्या अट्टुकल मंदिरामध्ये साजऱ्या होणाऱ्या ‘अट्टुकल पोंगला’ नामक देवीच्या उत्सवामध्ये केवळ महिला समाविष्ट होत असतात. किंबहुना केवळ महिलांची सर्वाधिक उपस्थिती असलेला धार्मिक उत्सव म्हणून या उत्सवाचा उल्लेख गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही केलेला आहे. त्यावेळी पोंगल साठी एकूण तीस लाख महिलांनी हजेरी लावून हा विक्रम नोंदविला होता.
temple1
राजस्थान येथील पुष्कर येथे असलेल्या ब्रह्मा मंदिरामध्ये विवाहित पुरुषांना प्रवेश करण्याची अनुमती नाही. या परंपरेशी निगडीत एका आख्यायिकेनुसार भगवान ब्रह्मांनी पुष्कर नदीच्या तटावर सरस्वतीसमवेत यज्ञ करण्याचे योजिले होते. पण यज्ञाला सरस्वती वेळेवर न पोहोचल्याने ब्रह्माने देवी गायत्रीशी विवाह केला आणि यज्ञ पूर्ण केला. सरस्वतीला हे कळल्यानंतर तिने कोपाविष्ट होऊन ब्रह्माला शाप दिला. त्यामुळे आजही या मंदिरामध्ये विवाहित पुरुषाचा प्रवेश निषिद्ध मनाला जातो. या मंदिराचे निर्माण चौदाव्या शतकामध्ये केले गेले आहे. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाण्याची परवानगी महिलांना नसे. मात्र या परंपरेविरुद्ध २०१६ साली उच्चनायालयाने दिलेल्या आदेशानुसार गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश करता येणार नसल्याने पुरुषांसाठीही प्रवेश मना करण्यात आला आहे.
temple2
कन्याकुमारी येथे असलेले भगवती मंदिर दुर्गेच्या कुमारिका रूपाला समर्पित आहे. या देवीला संन्यासरूपी ही मानले गेले आहे. म्हणूनच या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याची अनुमती पुरुषमंडळींना असली, तरी मंदिराच्या आतमध्ये येण्याची परवानगी विवाहित पुरुषांना नाही. देवी सतीच्या पाठीचे मणके येथे पडले असल्याची कथा पुराणांमध्ये उल्लेखलेली आहे.

Leave a Comment