फळांच्या आणि भाज्यांचा सालींचा असा करा वापर

peels
कुठलेही फळ किंवा भाजी खाताना ज्या भाज्या किंवा फळे सालीसकट खाणे शक्य नसते त्यांची साले बहुधा कचऱ्यामध्ये टाकून दिली जातात. पण काही फळे आणि भाज्यांच्या साली अशा असतात ज्यांचा वापर आपण अनेक प्रकारे करू शकतो. संत्र्याच्या सालींचा उपयोग बुटांमधून दुर्गंधी घालविण्यास करता येतो. यासाठी संत्र्याची साल रात्रभर बुटांमध्ये घालून ठेवावी. ही साल बूटांमधील दुर्गंधी अवशोषित करून घेते. सकाळी ही साल बुटांमधून काढून टाकावी. पावले सतत बुटांमध्ये बंद असल्याने, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावलांना दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी ही दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी संत्र्याची ताजी किंवा वाळविलेली साले गरम पाण्यामध्ये घालून त्यामध्ये पावले बुडवावीत. आठवड्यातून दोन ते ती वेळा हा उपाय केल्याने पावलांतून दुर्गंधी येणे कमी होते. ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, त्यांनी संत्र्याची साल सावलीमध्ये वाळवून त्याची बारीक पूड करावी. ही पूड तुपासोबत सममात्रेत दिवसातून तीन वेळा घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीची समस्या पुष्कळ अंशी कमी होते.
peels1
लिंबाची सालही अतिशय उपयुक्त असते. लिंबाची साले आणि कच्च्या केळ्यांच्या गराचे लहान लहान तुकडे करून सावलीत वाळवावे. लिंबाची साले आणि केळीचे तुकडे चांगले वाळल्यावर मिक्सरवर बारीक पूड करून घ्यावी आणि हे चूर्ण घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावे. उलट्या किंवा जुलाब होत असल्यास हे चूर्ण दर दोन तासांनी एक लहान चमचा भरून पाण्यासोबत घ्यावे. यामुळे उलट्या आणि जुलाबापासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे डाळींबाची साल देखील अतिशय उपयुक्त आहे. हिरड्यांमध्ये काही इन्फेक्शन झाले असल्यास किंवा तोंडामध्ये जीवाणूंच्या संक्रमणामुळे दुर्गंधी येत असल्यास डाळिंबाच्या सालीचे बारीक तुकडे करून घेऊन थोड्या पाण्यासोबत मिक्सरवर वाटावेत. या पाण्याने चुळा भरल्या असता जीवाणूंचा संसर्ग कमी होण्यास मदत होते.
peels2
डोळ्यांच्या खाली हलकी सूज असल्यास किंवा चेहऱ्यावर उन्हामुळे काळसर डाग आले असल्यास बटाट्याच्या साली चेहऱ्यावर हलक्या हाताने रगडाव्या. हा उपाय दोन आठवडे केल्यास चेहऱ्यावरील डाग हलके होण्यास मदत होते, तसेच डोळ्यांच्या खाली येत असलेली सूजही कमी होते. बटाट्याची साल वाळवून ही साले खोबरेल तेलामध्ये मिसळावीत आणि पाच दिवस हे तेल तसेच राहू द्यावे. पाच दिवसांनी हे तेल गरम करून घ्यावे आणि थंड झाल्यावर बाटलीमध्ये भरून ठेवावे. हे तेल केसांना लावले असता अकाली पांढरे झालेले केस पुनश्च काळे होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment