ब्रिटनमध्ये आहेत असेही अजब कायदे !

britain
प्रत्येक देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी, देशामध्ये सुव्यवस्था असावी, यासाठी काही कायदे-नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र यातील कायद्यांचा उपयोग काही दशकांपूर्वी आवश्यक असला, तरी आजच्या काळातही काही कायदे काळानुरूप कोणतेही बदल न करता पूर्वीप्रमाणेच राहू देण्यात आले आहेत. असेच काही कायदे आजच्या तारखेमध्येदेखील ब्रिटनमध्ये अस्तित्वात आहेत. ब्रिटनमध्ये असलेल्या कायद्यानुसार नागरिकांना मोठ्या लाकडी फळ्या, शिड्या, चाके इत्यादी वस्तू गाडीमधून नेण्याची परवानगी असली, तरी या वस्तू हातामध्ये घेऊन फुटपाथवरून चालण्याची परवानगी मात्र नागरिकांना नाही. हा कायदा एकोणिसाव्या शतकामध्ये पादचारीमार्गांवर चालणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितता ध्यानी घेऊन अस्तित्वात आणला गेला होता. सर्वाजानिक ठिकाणी पतंग उडविणेही ब्रिटनमध्ये कायद्याने मना आहे.
britain1
ब्रिटीश सागरी हद्दीतले सर्व सागरी जीव, विशेषतः व्हेल्स सारखे जीव ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिच्या मालकीचे असून, हे मासे पकडणे कायद्याच्या विरुद्ध आहे. हा कायदा तब्बल सातशे वर्षांपूर्वी, राजे एडवर्ड (दुसरे) यांच्या राजवटीमध्ये अस्तित्वात आणला गेला होता. त्याचप्रमाणे पोलंड देशातून विना परवाना बटाटे मागविणे देखील ब्रिटनमध्ये कायद्याने मना आहे. पोलंड देशातून बटाटे मागविताना त्यासाठी योग्य सूत्रांकडून आवश्यक त्या परवानग्या, बटाटे कुठून मागविले गेले, कुठे पाठविले जाणार आहेत, कुठल्या तारखेला पाठविले गेले, इत्यादी सर्व माहिती लेखी स्वरूपात असणे बंधनकारक आहे. पोलंडमधील बटाट्याच्या पिकावर एके काळी ‘रिंग रॉट डिसीज’ नामक रोग पसरल्याने हे रोघट बटाटे ब्रिटनमध्ये येऊ नयेत यासाठी हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला होता. आजही पोलंडमधून आयात होणाऱ्या बटाट्यांच्या सोबत, ‘हे बटाटे रिंग रॉट रोगमुक्त’ असल्याचे प्रमाण पत्र देणे आवश्यक असते.
britain2
राणी एलिझाबेथ(दुसरी) ही ब्रिटनची राणी असल्यामुळे तिचा कोणत्याही प्रकारे अपमान केला जाण्याला कायद्याने मनाई आहे. ब्रिटनमध्ये बहुतेक सर्व पोस्टेज स्टँम्पस् वर राणी एलिझाबेथचे मुखचित्र आहे. आणि म्हणूनच हा पोस्टेज स्टँम्प पत्रावर व्यवस्थित चिकटविला जावा असा नियम आहे. पोस्टेज स्टँम्प उलटा लावणे, तिरका लावणे हा ब्रिटनमध्ये दंडनीय अपराध आहे.

Leave a Comment