बहुप्रतिक्षीत ‘कलंक’चा ट्रेलर अखेर रिलीज

kalank
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’चा टीजर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने प्रतीक्षा करत असून त्या प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली असून नुकताच या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलियाच्या वाढदिवशी म्हणजेच गेल्या महिन्याच्या 15 मार्चला चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. त्यानंतर चित्रपटाच्या पोस्टरची मालिकाच सुरु झाली. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. यानंतर आलेल्या ‘कलंक’च्या टीजरने तर चाहत्यांचा उत्साहचा आणखीच दुणावल्यामुळे कधी एकदाचा या चित्रपटाचा ट्रेलर येतो, असे चाहत्यांना वाटत होते.

दरम्यान चित्रपटाची कथा काय आहे याबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. या चित्रपटाच्या निर्मितीवर तब्बल 80 कोटींचा खर्च करण्यात आले असून ४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत. करण जोहरने चित्रपटाला भव्यदिव्य बनवण्यात कुठलीही कसर न सोडल्यामुळे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment