तुमचा ‘ संतुलित ‘ आहार आजारपणास कारणीभूत ठरत नाही ना?


संतुलित आणि योग्य आहार म्हणजे नेमके काय आणि त्याचा अवलंब कसा करावा ह्या बद्दल आहारशास्त्रामध्ये अनेक पर्याय सुचविले गेले आहेत. अश्या ह्या निरनिराळ्या पर्यायांमुळे योग्य आहार नेमका कसा असावा ह्याबद्ल मनामध्ये खूप गोंधळ उडणे साहजिक आहे. उद्हार्ण द्यायचे झाले, तर वाईनचे देता येईल. आहारशास्त्रातील एका अभ्यासाच्या मते वाईनच्या मर्यादित सेवानाने दातांमधील व हिरड्यांमधील हानिकारक जीवाणूंचा नाश होतो तर आणखी एका रिसर्चच्या मते आहारातील वाईनचे सेवन त्वचेच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकते. अधून मधून काही ठराविक तऱ्हेचे डायट शरीराच्या, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असल्याचे ऐकिवात येत असते. उदाहरणार्थ फ्रुट डायट, किंवा आहारामध्ये डार्क चॉकोलेट किंवा समुद्री मिठाचा वापर करणे अश्या प्रकारचे सल्ले दिले जात असतात. पण अश्या प्रकारची डायट किंवा असे अन्नपदार्थ खरोखरच शरीराच्या दृष्टीने फायदेशीर आहेत किंवा नाही याचा विचार करणे अगत्याचे ठरते.

डार्क चॉकोलेटमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असून साखरेचे पप्रमाण देखील यामध्ये कमी असते. पण तरीही यामध्ये कॅलरीजचे प्रमाण लक्षणीय असल्याने ह्याचे सेवनदेखील इतर गोड पदार्थांप्रमाणे, मर्यादित प्रमाणात करायला हवे, असे आहारतज्ञ म्हणतात. तसेच आजकाल मैद्याने बनविल्या ब्रेड ऐवजी मल्टी ग्रेन ब्रेड किंवा होल व्हीट ब्रेड जास्त पौष्टिक समजला जातो. पण ब्रेड जरी कोणत्याही प्रकारचा असला, तरी त्यामध्ये साखर, ट्रान्स फॅट्स, आणि काही प्रमाणात मैदा असतोच हे लक्षात घ्यायला हवे. होल व्हीट ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, आणि जीवनसत्वे देखील यामधे आहेत. तसेच मल्टी ग्रेन ब्रेड, लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या धान्यांपासून बनविला जातो. पण तरीही काही प्रमाणात ट्रान्सफॅट आणि मैदा ह्यांचा वापर यामध्ये केलेला असतो. त्याचप्रमाणे न्युट्रीशन बार्स देखील प्रमाणामध्ये सेवन करणे आवश्यक आहे, कारण ह्यांमध्ये साखर आणि फॅट चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जेव्हा त्वरित उर्जेची, म्हणजे एनर्जीची आवश्यकता असेल, आणि इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल, तेव्हाच एनर्जी बार्सचे सेवन केले जावे.

फळे आरोग्यासाठी उत्तम आहेत हे आपल्याला ठाऊक आहे, पण फळांमध्ये देखील साखरेचे प्रमाण असतेच. त्यामुळे फळे किती आणि कधी खाल्ली जावीत ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. फळांचे सेवन शक्यतो दिवसाच्या सुरुवातीला केले जावे. सकाळी फळे खाल्ली जात नसल्यास त्यांचे सेवन शक्यतो दिवसाच्या पूर्वार्धात होईल असे पाहावे. त्याचप्रमाणे समुद्री मीठ हे सामान्य मिठाच्या मानाने जास्त आरोग्यदायी आहे असे समजले जाते. खरे तर दोन्ही प्रकारच्या मिठांमध्ये सोडियमची मात्रा चाळीस टक्के, म्हणजे एका टीस्पूनमध्ये २३०० मिलीग्राम इतकी आहे. पण समुद्री मिठाचे कण आकाराने मोठे असल्याने ते आपोआपच कमी वापरले जाते. पण म्हणून सामान्य मीठ वापरण्यात देखील काही अपाय नाही. मुळातच आहारामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित असायला हवे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment