संस्कारी बाबूजींची अजय देवगणकडून पाठराखण

ajay-devgan
नुकताच अजय देवगणच्या आगामी दे दे प्यार दे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून वाढदिवसाच्या निमित्ताने अजय देवगणने त्याच्या चाहत्यांना ही भेट दिली. प्रेक्षकांना हा ट्रेलर प्रचंड आवडला असून या ट्रेलरमध्ये आपल्याला अजय देवगणसोबतच तब्बू, जावेद जाफ्री आणि आलोकनाथ हे पाहायला मिळत आहे.

आलोकनाथ यांना दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. एका महिलेने आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. चित्रपटात मीटूमध्ये अडकलेल्या अभिनेत्याला संधी कशी दिली असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. अजय देवगणला या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी आलोकनाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी विचारले असता आलोकनाथ यांची बाजू घेताना अजय दिसला. मीडियाला त्याने सांगितले की, ज्यावेळी हा आरोप आलोकनाथ यांच्यावर लागला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण त्याच्याआधीच पूर्ण झाले होते. या मुद्दावर बोलण्याची ही योग्य वेळ नसल्याचे म्हणत अजय देवगणने हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

दे दे प्यार दे या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच झाल्यानंतर लोकांनी अजय देवगण आणि या चित्रपटाचे निर्माते भुषण कुमार यांना विविध प्रश्न विचारत ट्रोल केले आहे. आलोकनाथ यांच्यावर एवढे गंभीर आरोप असताना देखील तुम्ही त्याच्यासोबत काम कसे करत आहात असे त्यांना विचारले जात आहे. त्याचबरोबर आलोकनाथ यांना वेगळा न्याय आणि मी टू प्रकरणात अडकलेल्या इतरांना वेगळा न्याय का दिला जात आहे.

Leave a Comment