तुम्ही पाहिले आहे का ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’मधील ए. आर. रेहमानचे हे गाणे

AR-Rahaman
भारतातील मार्व्हल सुपरहिरोंच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी पुढच्या महिन्यात अव्हेंजर्स चित्रपट मालिकेतील शेवटचा भाग ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ रिलीज करण्यात येणार आहे. तसेच ए. आर. रेहमान या चित्रपटामध्ये भारतीय चाहत्यांसाठी गाणे संगीतबद्ध करणार असल्याचे समोर आले होते. फक्त भारतीय चाहत्यांसाठी हे गाणे असून ते गाणे तीन स्थानिक भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

नुकतेच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटातील ते गाणे रिलीज करण्यात आले आहे. ए. आर. रेहमानचे गाणे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट केले आहे. हे गाणे ट्विट करताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असे ए.आर. रेहमान हे संगीतकार आहेत. भारतीय चाहत्यांसाठी मार्व्हल स्टुडिओने हे खास गाणे तयार करण्यासाठी रेहमान यांच्याकडे विचारणा केली होती. त्यांना रेहमान यांनी तात्काळ होकार दिला होता. हे गाणे हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये आता प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment