अवघ्या चोवीस तासात कलंकच्या या गाण्याला मिळाले विक्रमी व्ह्युज

kalank
सध्या एका चित्रपटाची चर्चा सोशल मीडिया आणि बॉलिवूडच्या गोत्यात सुरु आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या निर्मिती दिग्दर्शनासोबत तगड्या स्टारकास्टलाही याचे श्रेय जाते. याला कारण या चित्रपटातील गाणी असून करण जोहरच्या ‘कलंक’ या आगामी चित्रपटाची अरिजित सिंग, श्रेया घोषाल अशा गायकांचे आवाज, प्रितमचे संगीत अशी घडी बसलेली ही गाणी आहेत

या चित्रपटाचे शीर्षकगीत नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे अमिताभ भट्टाचार्य लिखित आणि प्रितमने संगीतबद्ध केलेले अरिजित सिंगने गायले आहे. गाण्यात आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, संजय दत्त अशा कलाकारांची झलक पाहायला मिळते. आलिया आणि वरुणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री गाण्याच्या बहुतांश भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकते.

पडद्यावर या जोड्यांची केमिस्ट्री आणि त्याला सोबत असणारा अरिजितचा मनाचा ठाव घेणारा सुरेख आवाज हे समीकरण खऱ्या अर्थाने ‘कलंक’च्या यशात महत्त्वाची भूमिका निभावणारे ठरणार आहे. या गाण्याला अवघ्या चोवीस तासांमध्ये विक्रमी व्ह्यूज मिळाले असून, याविषयीचा आनंद खुद्द करण जोहरनेही ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Leave a Comment