दीर्घायुषी होण्यामागचे हेच खरे गुपित, म्हणतात ब्रिटनमधील हे गृहस्थ

bob
संपूर्ण ब्रिटनमध्ये सर्वाधिक वय असण्याचा विक्रम दोन व्यक्तींच्या नावे नोंदलेला आहे. बॉब वेटन आणि आल्फ्रेड स्मिथ हे ते दोन गृहस्थ. या दोघांचा तसा परस्परांशी काहीच संबंध नाही, पण योगायोग असा, की या दोघांनी आपल्या वयाचा १११ वर्षांचा टप्पा ओलांडला आहे, आणि तोही एकाच दिवशी. बॉब आणि आल्फ्रेड या दोघांनी २९ मार्च रोजी वयाची १११ वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या दीर्घायुष्याचे खरे रहस्य वास्तविक काय आहे हे दोघेही नेमके सांगू शकणार नाहीत, पण सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सने बनलेली लापशी (पॉरीज) खाणे हे आपल्या उत्तम आरोग्याचे आणि दीर्घायुषी असण्याचे रहस्य असल्याचे आल्फ्रेड म्हणतात, तर मरण टाळणे हे त्याच्या दीर्घायुषी असण्यामागचे गुपित असल्याचे बॉब यांचे म्हणणे आहे.
bob1
बॉब आणि आल्फ्रेड या दोघांचाही जन्म २९ मार्च १९०८ साली झाला होता. आता वयाची १११ वर्षे उलटून गेल्यानंतर ठराविक आहारपद्धती, ठराविक व्यायाम, ध्यानधारणा, काही खास थेरपी असल्या कशाचीही मदत न घेता देखील आपण इतके दीर्घायुषी कसे ठरलो हे या दोघांनाही अद्याप न उलगडलेले कोडे असल्याचे यांचे म्हणणे आहे. आल्फ्रेडच्या मते दररोज सकाळच्या नाश्त्यामध्ये पॉरीज खाणे आणि आयुष्यभर आपल्याला मनपसंत असलेले काम करणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. बॉबना मात्र मरण टळत राहिल्याने ते दीर्घायुषी झाल्याचे वाटते.
bob2
आल्फ्रेड हे इन्व्हरगोरी, स्कॉटलंडचे निवासी असून, बॉब इंग्लंडमधील हँपशायरचे रहिवासी आहेत. या दोघांचा तसा परस्परांशी काही संबंध नसला, तरी आता एकाच दिवशी जन्मदिन असलेल्या या दोघांमध्ये खूपच आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नेमाने हे दोघे एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड्स पाठवीत आले आहेत.

Leave a Comment