‘ऍनाबेल’चा थरकाप उडविणार ट्रलेर रिलीज

Annabelle-Comes-Home
भयपटांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ‘कॉन्ज्युरिंग’या मालिकेतील आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा या मालिकेतील सातवा चित्रपट असून, त्याचे ‘ऍनाबेल कम्स होम’, असे नाव आहे.

ऍनाबेल कम्स होम या चित्रपटाचा पहिला ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. मागील चित्रपटांपेक्षाही काहीतरी भन्नाट ज्यामध्ये पाहायला मिळणार असल्याचे जाणवते. या चित्रपटाच्या निमित्ताने गॅरी डॉबरमॅन यांनी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्याचे कळते. त्यांनी यापूर्वी ‘ऍनाबेल’, ‘ऍनाबेल क्रिएशन’ आणि ‘द नन’ या आणि अशा इतर चित्रपटांच्या पटकथा लेखनाची जबाबदारी पार पाडली होती.

मऍकेन्ना ग्रेस, मॅडिसन, कॅटी सॅरिफ, पॅट्रीक विल्सन आणि वेरा फॅर्मिगा यांच्या जेम्स वॅन आणि पीटर सॅफ्रान यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत. ट्रेलरमधील दृश्य आणि एकंदरच कथानकाची गरज पाहता भयपटाला ऍनाबेल कम्स होम आणखी एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवणार असेच स्पष्ट होत आहे.

Leave a Comment