स्लोवाकीयाच्या इतिहासात प्रथमच महिला राष्ट्रपती

slova1
भष्टाचार विरोधात काम करणाऱ्या आणि पेशाने वकील असलेल्या ४५ वर्षीय झुनाना कॅप्यूटोवा यांची स्लोवाकियाच्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली असून देशाच्या इतिहासात त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. विशेष म्हणजे झुनाना यांना राजकारणाचा काहीही अनुभव नाही. या उलट त्यांचे प्रतिस्पर्धी मार्केस सेफ्फोविक हे राजकारणात अगदी मुरलेले ज्येष्ठ नेते आहेत. मार्कोस हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते तर झुनाना यांनी ही निवडणूक १० वर्षापूर्वी स्थापन झालेल्या प्रोग्रेसिव स्लोवाकिया पक्षातर्फे लढविली. या पक्षाचा पार्लमेंट मध्ये एकही सदस्य नाही. झुनाना यांना ५८ टक्के मते मिळाली तर प्रतिस्पर्धी मार्केस यांना ४२ टक्के मते मिळाली. या देशात ४० लाख मतदार आहेत.

slovakiya
झुनाना यांनी विजयी झाल्यावर शनिवारी रात्री केलेल्या भाषणात मतदारांचे आभार मानताना हा दुष्टांवर सुष्टांचा विजय असल्याचे सांगितले. झुनाना राष्ट्रपती निवडणुकीत उतरण्यामागे अनेक कारणे होती त्यातील मुख्य कारण जॅन कुसिनेक या पत्रकाराची गोळी घालून केली गेलेली हत्या हे एक होते. जॅन सातत्याने गुन्हेगारी आणि राजकारण याच्यातील संबंधाविषयी लिहित होता आणि शोध घेत होता. फेब्रुवारीत तो त्याच्या नियोजित वधु बरोबर असताना त्याला गोळ्या घातल्या गेल्या होत्या.

झुनानी राजकरणात सक्रीय नव्हत्या मात्र त्यांनी अवैध कचराकुंडी प्रकरणात १४ वर्षे चालविलेल्या दाव्यामुळे त्या चर्चेत होत्या. ४५ वर्षीय झुनानी या दोन मुलांच्या आई आहेत. या देशात गर्भपात आणि समलैंगिक विवाह या संदर्भात ठोस कायदा नाही मात्र हे दोन्ही प्रकार येथे मान्य नाहीत. तरीही झुनानी यांनी मात्र या दोन्ही गोष्टींसाठी नेहमीच समर्थन दिले होते त्यामुळे त्यांच्यावर चर्च कडून नेहमीच टीका केली जात होती.

झुनाना यांचा शपथविधी १५ जून रोजी होणार आहे असे समजते.

Leave a Comment