डायना ऐवजी दुसऱ्याच राजकन्येशी ठरणार होता प्रिन्स चार्ल्स यांचा विवाह

prince
राणी एलिझाबेथचे थोरले पुत्र प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांचा, एखादा परीकथेप्रमाणे भासणारा अभूतपूर्व विवाहसोहोळा २९ जुलै १९८१ साली पार पडला. मात्र १९९२ सालापर्यंत या विवाह संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आणि या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण वास्तविक डायनाचा प्रिन्स चार्ल्सशी विवाह हा योगायोग म्हणावा लागेल. खरे तर डायना ऐवजी प्रिन्स चार्ल्स यांचा विवाह दुसऱ्याच राजकन्येशी करून देण्याचा विचार राजपरिवार करीत होता. ही हकीकत सर्वप्रथम २०१६ साली प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘प्रिन्स विलियम- रॉयल्टी इन माय फॅमिली’ या माहितीपटाद्वारे प्रथमच प्रसिद्ध झाली. या माहितीपटानुसार प्रिन्स चार्ल्स यांचा विवाह डायनाऐवजी दुसऱ्याच एका राजकन्येशी होणार होता.
prince1
डायनाशी विवाह होण्यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचा विवाह लक्झेम्बर्गची राजकन्या प्रिन्सेस मारी अॅस्ट्रिड हिच्याशी योजण्याचा विचार राजपरिवार करीत होता. पण प्रिन्स चार्ल्स हे ‘चर्च ऑफ इंग्लंड’चे भावी प्रमुख असून, राजकुमारी मारी या कट्टर कॅथलिक होत्या. त्यामुळे या दोघांचा विवाह, तत्कालीन धार्मिक नियमांच्या नुसार मान्य होऊ शकला नसता. त्याचप्रमाणे त्या काळी चार्ल्स आणि डायना हे परस्परांच्या संपर्कामध्ये असल्याने डायनाला तेव्हापासूनच प्रसिद्धी मिळू लागली होती. एकोणीस वर्षांची, पूर्वायुष्यातील कोणत्याही प्रकारची प्रेमप्रकरणे, किंवा विवादास्पद घटना यांपासूनही डायना लांब असल्यामुळे भावी राज्यकर्त्याची पत्नी म्हणून डायना सर्वार्थाने अनुररूप पत्नी म्हणून पाहिली जात होती.
prince2
मारी अॅस्ट्रिड लक्झेम्बर्गच्या राजकन्या असून, त्यांच्या आणि चार्ल्सचा वयामध्ये फारसे अंतर नव्हते. मारी, लक्झेम्बर्गचे तत्कालीन ‘ग्रँड ड्यूक’ यांच्या थोरल्या कन्या होत्या. मारी यांनी ‘नर्सिंग’ आणि ‘ट्रॉपिकल मेडिसिन’चे प्रशिक्षण घेतले असून, लक्झेम्बर्ग येथील ‘रेड क्रॉस’ च्या त्या ग्लेई पन्नास वर्षे अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. चार्ल्स आणि डायना यांचा विवाह झाल्यानंतर वर्षभराने मारी अॅस्ट्रिड यांनी ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक कार्ल क्रिस्टीयन यांच्याशी विवाह केला. आता या दाम्पत्याला पाच अपत्ये आणि आठ नातवंडे देखील आहेत.

Leave a Comment