फिटबिटने लाँच केले वर्सा लाईट एडिशनचे व्हिअरेबल गॅजेट

fitbit
नवी दिल्ली – भारतात आपले ३ नवीन डिव्हाईस फिटबिट वर्सा लाईट एडिशन, फिटबिट इन्सपायर HR आणि फिटबिट इन्सपायर फिटबिटने नुकतेच लाँच केले आहे. त्याचबरोबर आपले फिटबिट अॅपही कंपनी लवकरच रिडिजाईन करणार आहे. युजर्स आपले डॅशबोर्ड ज्यामुळे आपल्या सोयीनुसार पर्सनलाईज करू शकणार आहेत.

युजर्सला नव्या अॅपच्या माध्यमातून नवीन कॉन्टेन्ट सर्च करणे, सोशल कम्युनिटीवर कनेक्ट होणे सोपे होणार आहे. अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, हेलियोज आणि रिटेल स्टोर्सवर हे तिन्ही डिव्हाईस विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

फिटबिट वर्सा लाईटमध्ये ऑटोमॅटिक अॅक्टिव्हिटी, २४x७ हार्ट रेट, स्लीप स्टेज ट्रॅकिंग, १५ गोल बेस्ड एक्सरसाईज मोड, जीपीएस, स्मार्टफोन नोटिफिकेशन असे फिचर्स देण्यात असून याची बॅटरी ४ दिवस चालणार आहे. वर्सा लाईट हे व्हाईट मलबेरी, मरिना ब्लू आणि चारकोल कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. याची किंमत १५,९९९ रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

फिटबिट इन्सपायर HRमध्ये ऑल डे ऑटोमॅटिक अॅक्टिव्हिटी, एक्सरसाईज आणि स्लिप स्टेज ट्रॅकिंगसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर याचे डिझाईन स्लिम असून याची किंमत ८,९९९ रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

फिटबिट इन्सपायरमध्ये ऑटोमॅटिक अॅक्टिव्हिटी, एक्सरसाईज, स्लिप स्टेज ट्रॅकिंग, रिमाईंडर, टायमर, स्टॉपवॉच असे फिचर देण्यात आले असून याची किंमत ६,९९९ रुपये एवढी आहे.

Leave a Comment