न्यायाधीशाने आरोपीला सुनाविली चार वर्षे पेप्सी न पिण्याची शिक्षा !

pepsi
हवाई येथील ख्रिस्टोफर मॉन्टिलियानो या एकवीस वर्षीय नागरिकावर खटला सुरु असता न्यायाधीश ऱ्होंडा लू यांनी त्याला पुढील चार वर्षे पेप्सी न पिण्याची अजब शिक्षा फर्माविली असल्याचे वृत्त ‘मावी न्यूज’ ने प्रसिद्ध केले आहे. आरोपी ख्रिस्टोफरवर कारची चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. ख्रिस्टोफर याला कारची चोरी केल्याच्या आरोपाखाली गतवर्षीच्या जून महिन्यामध्ये अटक झाली असून, त्याने सुरुवातीला ही गाडी चोरीची असल्याची आपल्याला अजिबात कल्पना नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्याचबरोबर आपल्या चुलत भावाकडून ही गाडी आपण पेप्सी विकत आणायला जाण्यासाठी मागून घेतली असल्याचेही ख्रिस्टोफरने पोलिसांना सांगितले होते. अधिक चौकशी केल्यानंतर ख्रिस्टोफरने सांगितलेली हकीकत खोटी असल्याचे निष्पन्न पोलीस तपासामध्ये झाले होते.
pepsi1
केवळ पेप्सी आणण्यासाठी इतर कोणाच्या मालकीची गाडी चोरी करणे हा गुन्हा ख्रिस्टोफरवर सिद्ध झाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली, त्यानंतर सात दिवस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्याला जामीन मिळाला, मात्र शंभर तास समाजसेवा, शंभर डॉलर्सचा दंड या शिवाय पुढील चार वर्षे पेप्सी न पिण्याची शिक्षा ही न्यायाधीश लू यांनी ख्रिस्टोफरला ठोठविली आहे. आठवडाभर तुरुंगाची हवा खावी लागल्याने ख्रिस्टोफर याच्या मनावर त्याचा योग्य तो परिणाम झाला असून आता आपल्या हातून पुन्हा कोणताही गुन्हा घडणार नाही याची खबरदारी आपण घेत असल्याचे ख्रिस्टोफरचे म्हणणे असल्याचे समजते.

Leave a Comment