वाढदिवसानिमित्त ट्वीटरला विकीपिडियाच्या शुभेच्छा.

twitter
‘विकीपिडिया’ ने तेवीस मार्च रोजी ‘ट्वीटर’चा तेरावा वाढदिवस असल्याची घोषणा केली आणि त्याचबरोबर स्वतः एखादा सिनियर सिटीझन असल्याच्या आविर्भावात ट्वीटरला ‘क्रांतिकारी विचारांचा तरुण’ म्हणत ट्वीटर बद्दल काही तथ्ये हौशी नेटीझन्ससाठी प्रसिद्ध केली. विकिपीडियाने तेवीस मार्च रोजी केलेल्या ट्वीटमध्ये ‘ट्वीटर आज, या दिनी तेरा वर्षांचे झाले असल्याबद्दल’ अभिनंदन केले आहे. जगातील सर्वात विस्तृत ऑनलाईन एन्सायक्लोपिडिया अशी ख्याती असलेल्या विकिपीडियाने ट्वीटर कसे विकसित होत गेले याचा ही इतिहास काही उदाहरणांच्या द्वारे आपल्या ट्वीटमध्ये वर्णन केला आहे.


यामध्ये १४० अक्षरांच्या पेक्षा अधिक अक्षरे असलेले पोस्ट्स ट्वीटर पोस्ट करता येऊ लागल्याला ४९९ दिवस झाले असून, ट्वीटरचा लोगो असलेला पक्षी अस्तित्वात येऊन ३११० दिवस उलटून गेल्याचेही म्हटले आहे. तसेच ट्वीटरबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास ‘विकिपीडियावरील पेज पाहावे’ असा ही सल्ला या ट्वीटमधे दिला गेला आहे.


विकिपीडियाच्या अभिनंदनपर ट्वीटवर, ट्वीटरनेही झटपट उत्तर देत ‘आमच्या बद्दल तुम्हाला इतकी माहिती असल्याचे वाचून बरे वाटले’ असल्याचे म्हटले आहे. यावर विकिपीडियाने ट्वीटरला ‘क्रांतीकारी विचारांचा नवतरुण’ म्हणत ट्वीटरवर ‘एडीट’ फीचर आणायचे झाल्यास ते कसे आणले जावे याबद्दलही आपल्याकडे पुरेशी माहिती असल्याचे म्हटले. ट्वीटर आणि विकिपीडिया यांच्यातील या मजेदार संभाषणाचा आनंद नेटीझन्सने देखील घेतला असून, नेटीझन्सनी देखील अनेक प्रतिक्रिया या पोस्ट्सवर व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment