रशियामध्ये असाही आगळा वेगळा खेळ !

russia
जगामध्ये अनेक ठिकाणी अनेक चित्रविचित्र खेळांच्या स्पर्धा आयोजित होत असतात. अशीच हटके स्पर्धा रशियातील क्रास्नोयार्स्क शहरामध्ये आयोजित केल्या गेलेल्या ‘सायबेरियन पावर शो’ मध्ये खेळली गेली. या शोमध्ये मुष्टीयुद्ध, आणि नृत्यस्पर्धा ही आयोजित केल्या गेल्या असून, एक आगळी वेगळी सपर्धा या शोचे प्रमुख आकर्षण ठरली. या स्पर्धेच्या विजेत्याला तब्बल तीस हजार रुबल्सचे, म्हणजे सुमारे साडे चारशे डॉलर्सचे इनाम देण्यात आले. ही स्पर्धा ‘मेल स्लॅपिंग चँपियनशिप’ या नावाने ओळखली जाते.
russia1
या ‘हटके’ स्पर्धेमध्ये एका वेळी दोन खेळाडू सहभागी होत असून दोघांनी एकमेकांना आळीपाळीने कानशिलात लगावायची असून, जो स्पर्धक पहिल्यांदा खाली कोसळेल तो हरला अशी ही स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये वासिली कमोत्स्की हा खेळाडू अंतिम विजेता ठरला असून, त्याला बक्षिसाची तीस हजार रुबल्सची रक्कम देण्यात आली असल्याचे वृत्त ‘डेडस्पिन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
russia2
या पूर्वी गतवर्षी रशियामध्ये आणखी एके ठिकाणी आयोजित केल्या गेलेल्या ‘सारीचेव पावर एक्स्पो’ मध्ये ही स्लॅपिंग चँपियनशिप आयोजित केली गेली असून, याही स्पर्धेतील विजेत्याला तीस हजार रुबल्सचे बक्षीस देण्यात आले होते.

Leave a Comment