असे होते ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाचे जीवन

queen
ब्रिटनची वर्तमानकालीन राणी एलिझाबेथ आणि त्याचबरोबर इतर शाही सदस्य अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्वे असून, यांच्याशी निगडीत हर तऱ्हेची माहिती प्रसारमाध्यमांच्या द्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. याच शाही खानदानाची एके काळची कुटुंबप्रमुख, राणी एलिझाबेथची आजी, तत्कलीन ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया हिच्याशी निगडित काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या. राणी व्हिक्टोरियाचा जन्म २४ मे १८१९ साली लंडनमधील केन्सिंग्टन पॅलेस येथे झाला. राजे जॉर्ज (तिसरे) यांच्या चार मुलांच्या नंतर व्हिक्टोरिया जन्मतःच ब्रिटनच्या राजगादीची पाचवी वारस ठरली. राजे जॉर्ज यांना चार मुले असून, जॉर्ज, फ्रेडेरिक, विलीयम आणि एडवर्ड या चार राजपुत्रांच्या पैकी जॉर्ज आणि फ्रेडेरिक यांना अपत्ये झालीच नाहीत, तर विलियम यांना झालेल्या दोन्ही मुली जन्मतःच दगविल्या. त्यामुळे या चार राजपुत्रांच्या पाठोपाठ एडवर्डची कन्या व्हिक्टोरिया राज्याची पाचवी वारस ठरली. बाकी तीनही राजपुत्रांचे वारस नसल्याने सर्व राजपुत्रांच्या पश्चात व्हिक्टोरिया ब्रिटनची महाराणी बनली.
queen1
राणीचे मूळ नाव अलेक्झांड्रीना व्हिक्टोरिया असले, तरी तिला केवळ व्हिक्टोरिया या नावानेच ओळखले जाऊ लागले. व्हिक्टोरियाच्या बालपणीचा बहुतेक सर्व काळ केन्सिंग्टन पॅलेस मधेच गेला. ती केवळ आठ महिन्यांची असताना तिच्या वडिलांचे न्यूमोनियाने निधन झाले, त्यामुले आपल्या मदतनिसांच्या सहाय्याने व्हिक्टोरियाच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी तिच्या आईने उचलली. व्हिक्टोरियाचे बालपण अतिशय एकाकी होते. तिला तिच्या वयाच्या मुलांसोबत मिसळू दिले जात नसे, किंवा इतर परिवारातील लोकांशी संपर्क ठेवण्याची मुभा तिला नव्हती. व्हिक्टोरियाने शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेतले नसले, तरी तिच्या शिक्षणासाठी जर्मन गव्हर्नेस नियुक्त करण्यात आली होती. इतर शिक्षणासोबत परदेशी भाषांचे शिक्षणही व्हिक्टोरियाला दिले जात असल्याने तिला इटालियन, फ्रेंच, लॅटीन, आणि जर्मन भाषा उत्तम अवगत होत्या.
queen2
१८३७ साली वयाच्या अठराव्या वर्षी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस येथे राहावयास आलेली ब्रिटनची पहिली राज्यकर्ती असून, तेव्हापासूनच बकिंगहॅम पॅलेस हे शाही परिवाराचे औपचारिक निवासस्थान बनले आहे. सामान्य मुलींच्या मानाने बेताचीच उंची असलेल्या व्हिक्टोरियाला ‘हिमोफिलीया’ या रोगाने जन्मतःच ग्रासलेले होते. हा आजार अनुवांशिक असून, व्हिक्टोरियाच्या परिवारातील अनेकांना हा आजार होता, म्हणूनच या आजाराला त्याकाळी ‘रॉयल डिसीज’ म्हटले जात असे. व्हिक्टोरियाच्या मुलाला देखील हा आजार असून, त्याला या आजारामुळेच मृत्यू आला होता.

१८३८ साली राज्य हाती आलेली व्हिक्टोरिया त्या काळी केवळ अठरा वर्षांची होती. व्हिक्टोरिया आपल्या मतांशी ठाम असे, त्यामुळेच तिच्या मंत्र्यांशी तिचे नेहमी मतभेद असत. व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट आणि तिची भेट, व्हिक्टोरिया केवळ सतरा वर्षांची असताना झाली, आणि १८३९ साली दोघे विवाहबद्ध झाले. प्रिन्स अल्बर्ट यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, त्यांचे एकवीस वर्षांचे दाम्पत्यजीवन अतिशय आनंदाचे होते. या दाम्पत्याला नऊ अपत्ये होती. व्हिक्टोरिया, अल्बर्ट एडवर्ड, अॅलिस, आल्फ्रेड, हेलेना, लुईसा, आर्थर, लियोपोल्ड आणि बिअट्रिस अशी हे नऊ अपत्ये होती.
queen3
व्हिक्टोरिया राणी असताना तिला जीवे मारण्याचे तब्बल सहा वेळा प्रयत्न केले गेले. १८४० साली तिला जीवे मारण्याचा पहिला प्रयत्न झाला. त्यावेळी व्हिक्टोरिया तिच्या पहिल्या अपत्याच्या वेळी गर्भवती असताना आपल्या रथातून निघाली असता, तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतरही दोन वेळा तिला याच प्रकारे जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. १८५० साली एका सैन्यातील अधिकाऱ्याने हातातील लाकडी छडीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या सर्व हल्ल्यांमधून व्हिक्टोरिया सुखरूप बचाविली होती. व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट यांच्या अकाली निधनाचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. त्यानंतर तिने जन्मभर शोकप्रदर्शनार्थ केवळ काळे कपडे परिधान केले.
queen4
व्हिक्टोरिया, त्या काळी आगगाडीमध्ये प्रवास करणारी पहिली शाही सदस्य ठरली. त्या काळी तिच्या राज्यातील बहुतेक घरांमध्ये वीज उपलब्ध करून देण्यात आली. राणी एलिझाबेथच्या आधी ब्रिटनची सर्वाधिक काळासाठी शासनकर्ती राहिल्याचा विक्रम राणी व्हिक्टोरियाच्या नावे होता. व्हिक्टोरियाने ब्रिटनवर ६३ वर्षे, सात महिने इतक्या कालावधीसाठी राज्य केले. वर्तमानकालीन राणी एलिझाबेथ हिला ब्रिटनचा राज्यकारभार हाती घेतल्याला पासष्ट वर्षांहूनही अधिक काळ उलटून गेला आहे.

Leave a Comment