सूनमुख दर्शनासाठी नीता अंबानी यांनी सुनेला दिला महागडा हिऱ्यांचा हार

neeta-ambani
काही दिवसांपूर्वी आपल्या देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी याच्या मुलाचा म्हणजेच आकाशचा विवाहसोहळा पार पडला. राजेशाही थाटात पार पडलेल्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियापासून सगळीकडेच जोरदार चर्चा झाली होती. आपली बालपणीची मैत्रीण श्लोका मेहतासोबत त्याने लग्नगाठ बांधली. आकाशच्या लग्नसोहळ्याला बी-टाऊनपासून राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.

मुंबईतील अंबानींच्या अँटिलिया या घरात श्लोकाचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात झाला. यावेळी आपल्याकडे असलेल्या परंपरेनुसार आपल्या सुनेच्या मुखदर्शनासाठी सासुबाई नीता अंबानी यांनी एक महागडी वस्तु श्लोकाला भेट म्हणून दिली.

यासंदर्भातील वृत वुमनसेरिया या संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एक महागडा हिऱ्याचा हार सासुबाई नीता अंबानी यांनी सुनबाई श्लोकाला भेट म्हणून दिला आहे. पण विशेष म्हणजे या हिऱ्याच्या हाराची किंमत ऐकून तुमचे फ्यूज देखील उडतील. हा हिऱ्याचा हार चक्क 300 कोटींचा असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

आपल्या सुनेला अंबानी कुटुंबियांचा पारंपारीक हिऱ्यांचा हार नीता यांना भेट द्यायचा होता. अंबानी कुटुंबाची पिढ्यान् पिढ्या नवीन सुनेला हा हार देण्याची प्रथा आहे. तिने थोरल्या सुनेला मिळणारा हार आपल्या सुनेला देण्याची अंबानी कुटुंबाची प्रथा असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पण या हराऐवजी श्लोकाला ३०० कोटी रुपये किंमतीचा ‘ला इंकम्पेरेबल’ नावाचा हिऱ्यांचा हार नीता यांनी भेट दिला. हा हार भेट मिळाल्याने श्लोका खूपच खूष झाली आहे. श्लोकाला तिची नणंद इशा पिरामल हिने आपल्या वहिनीला एक बंगला भेट दिला आहे.

Leave a Comment