या कंपन्यांच्या नावांचे ‘शॉर्ट फॉर्म’ कसे अस्तित्वात आले ?

short
एखादे नाव किंवा संबोधन खूप मोठे असेल, तर सहसा केवळ त्याची अद्याक्षरे वापरून बनविले गेलेले लहानसे नाव जास्त प्रचलित असते. म्हणूनच ‘वर्ल्ड वाईड वेब’ चा ‘www’ असा उल्लेख आपल्या जास्त परिचयाचा आहे. जगभरामध्ये असे अनेक मोठमोठे नामांकित व्यवसाय आहेत, ज्यांची मूळ नावे लांबलचक आहेत. म्हणूनच या कंपन्या त्यांच्या मूळ नावांच्या पेक्षा त्या त्या नावांच्या शॉर्ट फॉर्म्स वरून जास्त ओळखल्या जातात.
short1
अलीकडेच भारतातील हैदराबाद मध्ये शाखा उघडलेले आणि लवकरच मुंबईसहित भारताच्या इतर महानगरांमध्ये शाखा उघडण्याच्या तयारीत असलेले मूळचे स्वीडिश फर्निशिंग स्टोर ‘आईकिया’ चांगलेच यशस्वी ठरले आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांच्या किंवा ऑफिसेसच्या फर्निशिंगशी संबंधित हर तऱ्हेच्या वस्तू या स्टोरमध्ये उपलब्ध आहेत. ‘ आयकिया’ हा केवळ भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय असणारा ब्रँड आहे. या ब्रँडचे हे नाव या कंपनीचे संस्थापक इंग्वार काम्प्राड यांच्या नावाची अद्याक्षरे ‘i’ व ‘k’, तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बालपण व्यतीत झाले ते ‘एल्मटार्ड’ नावाचे फार्महाऊस, ( अक्षर ‘e’ ) आणि त्यांचे मूळ गाव अगुनारिड मधील अक्षर ‘a’ अशी सर्व अद्याक्षरे मिळून ‘ikea’ या ब्रँडचे नाव तयार झाले आहे.
short2
स्पोर्ट्सवेअर साठी सुप्रसिद्ध असलेली ‘अॅडीडास’ ही युरोपियन कंपनी १९२४ साली स्थापित झाली. या कंपनीचे संस्थापाक अडोल्फ डास्लर याच्या नावाची आणि आडनावाची सुरुवातीची तीन अद्याक्षरे घेऊन हे ब्रँड नेम तयार करण्यात आले आहे. १९८४ साली स्थापित झालेला सौंदर्य प्रसाधनांचा सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘मॅक’ हे नाव ‘मेक-अप आर्ट कॉस्मेटिक्स’ या नावाचा शॉर्ट फॉर्म आहे. अतिशय लोकप्रिय असलेला ऑनलाईन कम्युनिकेशन प्रोग्राम ‘स्काईप’ याचे मूळ नाव खरे तर ‘sky-peer-to-peer’ असे असणार होते. मात्र हे नाव अतिशय लांबलचक आहे हे लक्षात आल्यानंतर या कम्युनिकेशन प्रोग्रामचे नाव ‘स्काईपर’ असे करण्याचे ठरले. मात्र आणखी एका कंपनीच्या नावे हे नाव आधीपासूनच नोंदलेले असल्याने शेवटी ‘स्काईप’ या नावाने २००३ साली हा कम्युनिकेशन प्रोग्राम सुरु करण्यात आला.
short3
कपड्यांचा सुप्रसिद्ध ब्रँड ‘एच अँड एम’ १९४७ आली अस्तिवात आला. सुरुवातीला या ब्रँडच्या अंतर्गत केवळ महिलांसाठी कपडे उपलब्ध असल्याने याचे नाव ‘hennes’ होते. स्वीडिश भाषेमध्ये ‘hennes’ या शब्दाचा अर्थ ‘तिच्यासाठी’ असा होता. त्यानंतर स्टॉकहोम येथील मॉरिट्झ विडफोर्स या मासेमारी व शिकारीसाठी उपयोगामध्ये आणल्या जाणाऱ्या वस्तू विकणारी कंपनी जेव्हा ‘hennes’ ने विकत घेतली, तेव्हा १९६८ साली या कंपनीचे नाव ‘hennes and mauritz’ करण्यात आले. या नावाचा शॉर्ट फॉर्म असलेला ‘H&M’ हा ब्रँड आता जगप्रसिद्ध आहे.

Leave a Comment