पाकिस्तानातील ‘हे’ झाड आहे १२१ वर्षांपासून कैदेत

tree
आपल्या देशावर अनेकों वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटीशांची सत्ता जरी आता संपली असली तरी आपल्या देशात आणि शेजारील पाकिस्तानात ब्रिटीशांचे काही कायदे आणि नियम आजही अस्तित्वात आहेत. त्यानुसार आम्ही आज तुम्हाला एक घटना सांगणार आहोत. ब्रिटीशांच्या एका कायद्यानुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एक वडाचे झाड गेल्या १२१ वर्षांपासून कैदेत असून लोखंडी साखळ्यांनी प्रांतातील लंडी कोतलमध्ये हे झाड बांधलेले आहे. त्यावर असलेल्या एका पाटीवर ‘I am under arrest’ असे लिहिलेले आहे.
tree1
या झाडाबाबत असे सांगितले जाते की, त्याकाळी जेम्स स्क्विड नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. तो एका रात्री फारच नशेत होता. अशात त्याला असे वाटले की, त्याच्या दिशेने एक झाड येत आहे. त्यावेळी तो अधिकारी घाबरला आणि सोबत असलेल्या जवानांना त्याने आदेश दिला की, या झाडा आत्ताच्या आत्ता अटक करा. तेव्हापासूनच हे झाड कैदेत आहे. काही तज्ज्ञांच्या मते हे झाड ड्रेकोनियन फ्रन्टिअर क्राइम रेग्युलेशन(एफसीआर) कायद्याचे उदाहरण आहे. ब्रिटीश शासनाकाळात हा कायदा करण्यात आला होता. यानुसार ब्रिटीश सरकारला हा अधिकार होता की, ते पश्तून जनजातीच्या कोणत्याही व्यक्ती किंवा परिवाराने काही अपराध केला तर ते त्यांना शिक्षा देऊ शकतात.
tree2
विशेष म्हणजे उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या काही भागात एफसीआर हा कायदा अजूनही लागू आहे. परिसरातील लोक या कायद्यामुळे अनेक अधिकारांपासून वंचित राहतात. कायद्यानुसार गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसेल तरी सुद्धा या परिसरातील लोकांना अटक केली जाऊ शकते. त्यामुळेचे एफसीआरला मानवाधिकारांचे उल्लंघन मानले जाते.
tree3
एफसीआर कायदा रद्द करण्याची इच्छा २००८ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी व्यक्त केली होती. पण त्यावर पुढे काही झाले नाही. पण एफसीआर कायद्यात २०११ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. यात जामीन मिळण्याची सुविधा देण्यात आली. आणखीही काही सुधारणा केल्या गेल्या.

Leave a Comment