बॉलीवूडमधील या कलाकारांना करता येणार नाही मतदान

election
सध्या देशभरामध्ये निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यामुळे आवर्जून मत देऊन आपला मतदानाचा हक्क बजाविणे कसे गरजेचे आहे इथपासून कोणता राजकीय पक्ष सत्तेवर येणार इथपर्यंत अनेक चर्चा रंगत आहेत. सतराव्या लोकसभेसाठी अकरा एप्रिलपासून सुरु होणाऱ्या निवडणुकांसाठी आता संपूर्ण देश एकीकडे सज्ज होत असतानाच बॉलीवूडमधील काही नामांकित कलाकारांना मात्र मतदान करता येणार नाही.
election1
‘ओम शांती ओम’ या चित्रपटापासून आपल्या सिनेजगतातील कारकिर्दीची सुरुवात केलेली दीपिका पदुकोन आज जरी यशाच्या शिखरावर आरूढ असली, तरी मतदानाचा हक्क तिला बजाविता येणार नाही. दीपिकाचा जन्म डेन्मार्क देशातील कोपनहेगन शहरातील असून, ती अगदी लहान असतानाच तिचे पालक तिच्या समवेत भारतामध्ये स्थलांतरित झाले असले, तरी दीपिका औपचारीरित्या डेन्मार्क देशाची नागरिक आहे. त्यामुळे तिला भारतातील निवडणुकांमध्ये मतदान करता येणार नाही. अभिनेत्री कटरीना कैफ देखील ब्रिटीश नागरिक असून तिलाही मतदानाचा हक्क बजाविता येणार नाही.
election2
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिचा जन्म बहारेन येथील असून, ती औपचारिकरित्या श्रीलंका देशाची नागरिक आहे. जॅकलीनचे पिता एलरॉय फर्नांडीस श्रीलंकन तमिळ असून तिची आई किम मेलेशियन आहे. ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री नर्गिस फाखरी अमेरिकन नागरिक आहे. त्यामुळे तिलाही मतदान करता येणार नाही.
election3
अभिनेत्री सनी लियोनी कॅनडाची नागरिक आहे, तर आलिया भट्ट ब्रिटीश नागरिक आहे. बॉलीवूडचा लोकप्रिय ‘खिलाडी’ अक्षय कुमार यालाही मतदानाचा हक्क बजाविता येणार नाही. अक्षय औपचारिक रित्या कॅनडाचा नागरिक असून, त्याला कॅनडा देशाच्या वतीने ‘ऑनररी सिटीझनशिप’ देण्यात आली आहे. अक्षयला कॅनडातील विंडसर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सम्मानित केले आहे.

Leave a Comment