आणखी चांगले ऐकू येण्यासाठी करविली कानाची अशी शस्त्रक्रिया

ear
हौसेला काही मोल नसते असे म्हणतात आणि एखाद्या गोष्टीची हौस किंवा मनापासून इच्छा असली, की त्यासाठी काही जणे, कुठल्याही पायरीपर्यंत जाण्यासाठी मागेपुढे पहात नाहीत. आजकाल बॉडी मॉडीफिकेशनची ट्रेंड जोरात असून, यामध्ये आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी बदल हौशी मंडळी करून घेत असतात. ऑस्ट्रेलियाचा निवासी असलेल्या चार्ल्स बेन्टले या मनुष्याने आपल्याला आणखी चांगले ऐकू यावे यासाठी बॉडी मॉडीफिकेशन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याने खास स्वीडनमध्ये जाऊन ही शस्त्रक्रिया करवून ही घेतली.
ear1
या शस्त्रक्रियेच्या अंतर्गत चार्ल्सच्या कानाच्या पाळीच्या जवळील भाग संपूर्णपणे काढून टाकण्यात आला असल्यामुळे चार्ल्सचे कान आता पोकळ दिसत आहेत. स्वीडन येथील प्रसिद्ध बॉडी मॉडीफिकेशन एक्स्पर्ट चाय मायबर्ट यांनी ही शस्त्रक्रिया सफल रित्या केली आहे. चार्ल्सच्या कानांचा जो भाग काढून टाकण्यात आला आहे, त्याला वैद्यकीय भाषेमध्ये ‘कॉन्च’ म्हटले जात असून, या शस्त्रक्रियेला ‘कॉन्च रिमुव्हल प्रोसिजर’ म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया जितकी असामान्य आहे, तितकीच धोकादायकही आहे. त्यामुळे जगातील काही मोजके तज्ञच या शस्त्रक्रिया करण्यास सक्षम आहेत. मायबर्टने चार्ल्सच्या कानांवर ही शस्त्रक्रिया आपल्या स्टॉकहोम येथील स्टुडियोमध्ये केली असल्याचे समजते.
ear2
या शस्त्रक्रियेची माहिती मायबर्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली असून, आतापर्यंत या पोस्टवर सोळा हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी चार्ल्सच्या या नव्या ‘लुक’चे कौतुक केले आहे, तर काहींनी नाराजीही दर्शविली आहे. ही शस्त्रक्रिया कराविल्याने ऐकण्याची क्षमता वाढत असून, खासकरून पाठीमागून येणारे, दृष्टीपथात नसलेल्या वस्तूंचे आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येत असल्याचे मायबर्ट यांचे म्हणणे आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस आवाज नक्की कुठून येत आहेत हे समजण्यास अडचण होत असून, नव्याने केल्या गेलेल्या मॉडीफिकेशनप्रमाणे मेंदू त्वरित काम करू शकत नाही, पण साधारण दोन आठवड्यांच्या काळामध्ये ही अडचण नाहीशी होत असल्याचे मायबर्ट म्हणतात.

Leave a Comment