बॉलीवूडची क्वीन साकारणार ‘जयललिता’

kangana-ranavat
राजकारण आणि चित्रपटसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रांत जनमानसातील ‘अम्मा’ अशी प्रतिमा असलेल्या जयललिता यांनी आपली छाप उमटवली. भारतीय राजकीय व्यवस्थेतील इतर स्त्री नेत्यांच्या तुलनेत १४ वर्षांहून अधिक काळ तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या जयललिता या नेहमीच वेगळ्या ठरल्या. आता प्रेक्षकांच्या भेटीला त्यांच्या याच प्रवासावर आधारित चित्रपट येणार आहे.

याविषयीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. पण, जयललिता यांची भूमिका यात साकारण्याची संधी नेमकी कोणत्या अभिनेत्रीला मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. अशात हे नाव आता जाहीर झाले असून या बायोपिकमध्ये जयललितांच्या भूमिकेत बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत झळकणार आहे.

याबद्दलची अधिकृत घोषणा चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केली आहे. हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘थलाईवी’ असे तामिळ तर ‘जया’ असे या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए एल विजय करणार आहेत. तर ‘मणिकर्णिका’ आणि ‘बाहुबली’सारख्या चित्रपटांचे लेखक के व्ही विजेंद्र प्रसाद यांनी या बायोपिकचे कथा लेखन केले आहे.

Leave a Comment