जगाच्या इतिहासातील सर्वात खर्चिक विवाहसोहळे


विवाह ठरल्यापासून तो सोहोळा पार पडेपर्यंत निरनिराळे विधी, समारंभांमध्ये सतत पैसे खर्च होत असतात. अनेकदा तर विवाहोत्तर सोहळे देखील भरपूर खर्च करून केले जात असतात. एकदा का लगीनघाई संपली की मग खर्चाचे हिशोब सुरु होतात. कुठल्या गोष्टीसाठी किती खर्च आला, याची जमाबंदी सुरु होते. सर्वसाधारण पणे आपण ठरविलेल्या बजेटमधेच सर्व सोहोळा पार पडणे ही समाधानाची बाब असते. पण या जगामध्ये काही लोक असे आहेत, ज्यांच्या घरचे विवाहसोहळे पाहून, ते पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटले. विवाहसोहोळ्याच्या निमित्ताने अपार खर्च झालेले असे काही विवाहसोहळे…

ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेन्सर यांचा विवाहसोहोळा जगाच्या इतिहासामध्ये सर्वप्रसिद्ध ठरला आहे. ब्रिटनच्या शाही घराण्याचे आणि राज्याचे सर्वप्रथम वारस असलेले प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचा विवाह १९८१ साली पार पडला. विसाव्या शतकातील हा सर्वात खर्चिक विवाहसोहोळा म्हणता येईल. म्हणूनच हा विवाहसोहोळा अजूनही ब्रिटनमध्ये अजूनही चर्चिला जातो. त्याकाळी या विवाहसोहोळ्यासाठी तब्बल ४८ मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले. आजच्या काळामध्ये ही किंमत सत्तर मिलियन डॉलर्सपेक्षा देखील अधिक आहे.

सुप्रसिद्ध स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल यांची कन्या वनिषा मित्तल आणि अमित भाटीया यांचा विवाहसोहोळा देखील एखाद्या राजेशाही विवाह सोहोळ्यापेक्षा तसूभरही कमी नव्हता. लक्ष्मी मित्तल हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. वनिषा आणि अमित हे दोघेही इन्व्हेस्टमेंट बँकर्स असून, त्यांचा विवाह २००४ साली पार पडला. ह्या विवाहसोहोळ्या साठी तब्बल ६६ मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले होते. भारतीय चलनामध्ये ही किंमत ४२९ कोटी रुपये इतकी आहे.

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विलियम आणि कॅथरीन मिडलटन यांचा विवाहसोहळा देखील दीर्घकाळापर्यंत लोकांच्या स्मरणात राहील असा आलिशान होता. ‘ वेडिंग ऑफड द सेंच्युरी ‘ म्हणून हा विवाहसोहोळा नावाजला गेला. ह्या विवाहसोहळ्यासाठी ३४ मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.

फुटबॉलपटू वेन रुनी आणि कोलीन मक्लोहली ह्यांचा विवाहसोहळा देखील जगातील सर्वाधिक खर्चिक विवाहसोहोळ्यांपैकी एक आहे. ह्यांच्या विवाहसोहोळ्याची छायचित्रे विकत घेण्यासाठी एका सुप्रसिद्ध मासिकाने ४.२ मिलियन डॉलर्स देऊ केले होते. रुनीने आपल्या विवाहसोहोळ्या साठी उपस्थित राहणाऱ्या पाहुणे मंडळींच्या येण्या जाण्यासाठी पाच खासगी विमाने भाडे देऊन मागविली होती. ह्या विवाह सोहोळ्यासाठी तब्बल आठ मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आला. आजच्या काळामध्ये ही किंमत सुमारे ५५ कोटी रुपये इतकी आहे.

अमेरिकेचे पूर्वराष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांची कन्या चेल्सी क्लिंटन आणि मार्क मेजविन्स्की यांचा विवाहसोहोळा देखील अतिशय दिमाखात पार पडला. २०१० साली पार पडलेल्या ह्या विवाहसोहोळ्यासाठी पाच मिलीयन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.

या जोडप्याने एकाच वर्षात केला बारा वेळा विवाह !

Leave a Comment