या पठ्ठ्याने चक्क 25 चेंडूत झळकवले शतक

century
ब्रिटन : क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ म्हणून ओळखला जातो. या खेळात कधी कोणता विक्रम रचला जाईल याचा काही भरोसा नाही. जुने विक्रम तोडण्याचे काम नवे खेळाडू करतात. आता असाच एक विक्रम इंग्लंडच्या अंडर 19 संघातील एक खेळाडूने रचला आहे. त्याने एका सामन्यात चक्क 25 चेंडूत शतक झळकवले आहे. विल जॅक्स असे त्या खेळाडूचे नाव असून त्याने इंग्लंडमध्ये सर्रे काउंटीकडून खेळताना टी10 सामन्यात त्याने ही कामगिरी केली.


एकाच षटकात विल जॅक्सने 6 षटकार मारले. अवघ्या 22 चेंडूत त्याने 98 धावा केल्या होत्या. त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव गेल्याने शतकासाठी 25 चेंडू लागले. 30 चेंडूत जॅक्सने 105 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर सर्रे काउंटीने 10 षटकांत 3 बाद 176 धावा केल्या. जॅक्सच्या शतकी खेळीत 4 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. टी20 नंतर आता टी10 क्रिकेटची क्रेझ आली आहे. सध्या एमिरेट क्रिकेट बोर्ड या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत आहे. याला आयसीसीकडून मान्यता मिळाली आहे.

Leave a Comment