चिकनवर दूध पिणे आरोग्यासाठी घातक

chicken
आपल्या शरीरासाठी दूध आणि चिकन हे लाभदायक आहे आपल्याला माहितच आहे. पण हे दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास त्वचा आणि पोटाचे विकार होतात. कॅल्शियम, मिनरल्स अशी पोषक द्रव्य दुधात असतात. दूध कितीही पौष्टिक असले तरी ते चिकनसोबत घेणे घातक आहे. चिकन आणि दूध एकत्र घेतले तर पोटाचे आजार होऊ शकतात. तसेच विटिलिगो हा त्वचेचा आजार होतो. यात शरीरातील मेलामिन कमी होते. त्यामुळे त्वचेची समस्या उद्भवते.
chicken1
मासे आणि दही पूर्वी एकत्र खाल्ले तरी त्रास व्हायचा. आता दुग्धजन्य पदार्थ चिकनबरोबर खाऊ नये असा शोध लागला आहे. वारंवार चिकन आणि दूध एकत्र घेतले तर त्रास होतो. कधीतरी घेतले तर त्रास होत नाही. काही जण चिकन बनवताना त्यात दही मिक्स करतात. प्रोटिन्स चिकन आणि दूध दोन्हीमध्ये असल्याने दोन प्रोटिन्सचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने हा त्रास होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment