बँका स्वीकारणार का रंग लागलेल्या नोटा?

note
कालच देशभरात रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्यातील काही हौशी कलाकार रंगपंचमी खेळण्याच्या उत्साहात आपल्या खिशातील नोटा काढून ठेवण्यास विसरले असतीलच यात काही शंका नाही. पण आता त्यांना या नोटांना लागलेल्या रंगाबाबत टेंशन झाले असेल. कारण रंग लागलेल्या नोटा अनेक वेळा दुकानदार स्वीकारत नाही. त्याचबरोबर या नोटा बँका देखील स्वीकारतील का? याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसते. पण, नोटांना रंग लागला असल्यास काहीही काळजी करण्याचे कारण नाही. कारण, या नोटा तुम्ही बँकेत बदली करू शकता.
note1
भारतीय रिझर्व्ह बँकेने 3 जुलै 2017 रोजी एक आदेश काढला होता. कोणत्या नोटा स्वीकाराव्यात? आणि कोणत्या नाही? याबद्दलची माहिती त्यामध्ये आहे. राजकीय घोषणा जर एखाद्या नोटेवर लिहिलेली असेल तर ती नोट स्वाकारली जाणार नाही असे म्हटले असल्यामुळे नोटांबाबत काळजी घ्या.
note2
यापूर्वी रंग लागलेल्या नोटा बँक स्वीकारत नाहीत असा मेसेज व्हायरल झाला होता. पण, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, रंग लागलेल्या नोटा या बँकांमधून स्वीकारल्या जातात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जाणतेपणे फाटलेल्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत ही बाब देखील ध्यानात घेणे महत्त्वाचं आहे. नोट फाडली की फाटली हे ओळखणे थोडे कठीणच काम आहे. पण, नीट पाहिल्यास हा फरक देखील कळतो. शिवाय, बँक फाटलेली नोट घेताना महत्वपूर्ण माहिती तर गेली नाही ना? याचा विचार करते. त्यानंतर फाटलेली नोट स्वीकारली जाते. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करा.

Leave a Comment