चक्क आकाशातून अवतरणार अण्णांची शेवंता

shewanta
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका असलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला काही महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली. मागच्या पर्वाप्रमाणेच या मालिकेतील एका पात्राची जोरदार चर्चा होता आहे. ते पात्र म्हणजे शेवंता, मालिकेमध्ये जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
shewanta1
मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा अपूर्वा नेमळेकर या साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. आता हीच शेवंता चक्क आकाशातून अवतरणार आहे. शेवंताची दिलखेच अदाकारी झी चित्र गौरव सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध गाण्यांवर शेवंता नृत्य करणार आहे.

Leave a Comment