स्तनपानामुळे बाळाला नेमके काय मिळते ?

feeding
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काही महिला आपल्या बाळाला स्तनपान करण्याचे टाळतात. पण त्यांना हे कळत नाही की आपले दुध हे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण बाळाला आईच्या दूधातून नेमके काय मिळते. बाळावर त्याचा काय फरक पडतो आणि आईचे दूध पिणारे बाळ जास्त निरोगी असते का? याबाबतची माहिती फार कमी लोकांना असते. पण आज आम्ही तुम्हाला आईच्या दुधामुळे बाळाला होणारे फायदे सांगणार आहोत.
feeding1
आईचे दूध प्यायल्याने बाळाला यातून रोगप्रतिकारक शक्ती मिळते. लोक्टोफोर्मिन तत्व आईच्या दूधात असते. जे आईच्या स्तनापर्यंत थोरॉसिक डक्ट नळीतून पोहोचते. बाळाच्या नाक आणि घश्याच्या भागात यामुळे रोगप्रतिरोधी त्वचा तयार करते. नुकत्याच झालेल्या संशोधनातून आईचे दूध पिणारी मुले जास्त बुद्धिमान असल्याचे समोर आले आहे.
feeding2
आईचे पुरेसे दूध ज्या मुलांना मिळत नाही अशा मुलांना बालपणातच डायबिटीज होण्याचा धोका असतो. या मुलांच्या बुद्धीचा विकास इतर मुलांच्या तुलनेत कमी होतो. 30 वर्षे वयाच्या 3500 लोकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. एक आय क्यूटेस्ट या लोकांची घेण्यात आली.
feeding4
हे संशोधन रिसर्च द लँसेट ग्लोबल हेल्थ जनरलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुलाच्या जन्माच्या वेळेस कुटूंबाची आर्थिक परिस्थिती पेटरनल स्कूलिंग, गर्भवती असताना आईने धुम्रपान करणे, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय, मुलाचे वजन, आणि प्रसुती कशी झाली इ. गोष्टींचा समावेश या संशोधनात करण्यात आला.
feeding3
ज्या मुलांनी 12 महिन्यांपर्यंत स्तनपान केले आहे. 1 महिन्यापर्यंत स्तनपान करणाऱ्या मुलांच्या तुलनेत त्यांचा आय क्यू लेव्हल चार पटींनी जास्त असतो असे या संशोधनात दिसून आले आहे. polyunsaturated fatty acids आईच्या दूधात असते. ज्यामुळे मुलाच्या मेंदूचा विकास होतो. आईच्या दूधातून एक खास जीनोटाईपच्या मुलांचा आय क्यू ला ब्रेस्ट फिडींगमुळे जास्त फायदा होतो असे या संशोधनातून समोर आल्यामुळे कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत मुलांना स्तनपान करणे गरजेचे मानले जाते. मुलांच्या छाती, कान व घसा इन्पेक्शनपासून स्तनापानामुळे बचाव होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment