महाभारतातील प्राचीन गावे म्हणजे आताची ही शहरे

gandhar
महाभारत ग्रंथामध्ये अनेक राज्ये, प्रदेश यांचे वर्णन येते. ही प्राचीन शहरे, राज्ये आज कुठे आहेत याची अनेकांना कल्पना नसेल. पण आजही हे प्रदेश अस्तित्वात असून ती वेगळ्या नावानी ओळखली जातात. महाभारतातील या प्राचीन शहरांचा परिसर आज भारत, पाकिस्तान आणि अफगानिस्तान देशात पसरलेला आहे.

कौरवांची माता गांधारी ही गांधार देशाची राजकन्या होती. हा गांधार म्हणजे सध्याचे पाक अफगाण बोर्डरवरचे कंधार हे शहर आहे. त्याकाळी हे राज्य पाकिस्तानच्या रावळपिंडीपासून अफगाणिस्तान पर्यंत पसरलेले होते. महाभारत युद्धनंतर पांडवांचा वंशज जनमेजय याने त्याचा पिता परीक्षित याला दंश करणाऱ्या तक्षक नागाला नष्ट करण्यासाठी जो सर्पयज्ञ केला तो येथेच असे मानले जाते.

indraprasth
इंद्रप्रस्थ आणि खांडववन यांचा महाभारतात उल्लेख आहे. इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती आणि येथेच बांधलेल्या मयसभेत दुर्योधनाची फजिती झाली आणि त्याला द्रौपदी हसली. त्यातूनच युद्धाची बीजे रोवली गेली असे मानले जाते. खांडववन जाळून कृष्ण आणि अर्जुनाने अग्नीची भूक भागविली होती. हा प्रदेश म्हणजे सध्याची भारताची राजधानी दिल्ली हे शहर होय.

द्रौपदी ज्या पांचाल राज्याची राजकन्या होती ते द्रुपद राजाचे पांचाल राज्य म्हणजे आज पश्चिम उत्तर प्रदेशातील बरेली, बदायु आणि फरुखाबाद हा भाग आहे. कानपूर आणि वाराणसी मधल्या गंगेच्या मैदानात हा भाग येतो.

hastinapur
कौरवांची राजधानी हस्तिनापुर म्हणजे मेरठ जवळचा भाग आहे. येथेच पांडवांना हरविणारे द्यूत खेळले गेले तसेच पांडव आणि कौरव यांचे लहानपण येथेच गेले होते. सध्या येथे पर्यटन स्थळ आहे.

kurushetra
कुरुक्षेत्र या नावाने प्रसिद्ध असलेले महाभारतातील युद्ध मैदान याच नावाने आजही प्रसिद्ध आहे. अंबाला जवळ हे ठिकाण असून येथेच १८ दिवस महाभारत युद्ध झाले आणि हजारो महान योध्ये येथे मारले गेले. कृष्णाने येथे अर्जुनाला गीता सांगितली. आजही हे स्थान पवित्र मानले जाते. येथे ब्रह्मदेवाचे एक प्राचीन मंदिर आहे.

Leave a Comment