दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले ‘शार्क’

shark
सर्वसामान्यपणे समुद्रामध्ये आढळणारा ‘शार्क’ जेव्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा त्याने साहजिकच केवळ प्रवाशांचे नाही, तर विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे देखील लक्ष आकृष्ट करून घेतले. मात्र हा शार्क खरोखरचा पाण्यातील शार्क नसून, रियाध येथून आलेले शार्क प्रमाणे दिसणारे एक कमर्शियल जेट होते. हे जेट E190-E2 एम्ब्रेअर असून, या जेटचे पेंटिंग ते एखाद्या शार्क प्रमाणे दिसावे अशा प्रकारे केले गेले होते. हे पेंटिंग इतके उतम प्रकारे केले गेले आहे, की आकाशातून हे विमान उडताना पाहिल्यानंतर ढगांच्या गर्दीतून चक्क एक मोठा शार्कच वेगाने पोहत येत असल्याचा भास होत असल्याचे म्हटले जाते.
shark1
या आगळ्या रूपातील जेटने केवळ प्रवाशांनाच नाही, तर विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना देखील आकृष्ट करून घेतले आहे. ‘आमच्या विमानतळावर हा शार्क अतिशय आकर्षक दिसत आहे’ अशा अर्थाचा ट्वीट ही दिल्ली विमानतळाच्या औपाचारिक ट्वीटर पेजवर करण्यात आला आहे. E190-E2 हे एम्ब्रेएर विमानांच्या ‘इ सिरीज’मधील विमान असून, ही विमाने अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बनविली गेली आहेत. सत्तर ते एकशे तीस यात्रेकरून प्रवास करू शकतील इतक्या क्षमतेची ही विमाने असून, मेनलाईन नेटवर्क्स, लो कॉस्ट एअरलाईन्स, किंवा स्थानिक मार्गांसाठी ही विमाने उत्तम असल्याचे एम्ब्रेएरची वेबसाईट म्हणते. सिंगल आयल सेग्मेंट मध्ये ही विमाने सर्वोत्तम असल्याचे ही म्हटले गेले आहे.
shark2
शार्कचे रूप दिलेले हे जेट जमिनीवर सुंदर दिसतेच पण तितकेच आकर्षक आकाशामध्ये ही दिसते. रन-वे वर हे ‘शार्क’ उभे असल्याची अनेक छायाचित्रे दिल्ली विमानतळावरून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंनीही सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.

Leave a Comment