लंडनच्या न्यायालयाने फेटाळला नीरव मोदीचा जामीन अर्ज

nirav-modi1
लंडन : घोटाळेबाज नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने फेटाळला असून 29 मार्चपर्यंत आता त्याला कोठडीतच राहावे लागणार आहे. लंडनमध्ये पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयातही हजर करण्यात आले. त्यावर नीरव मोदीने आपल्याला जामीन मिळावा अशी याचिका केली होती. पण त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर भारतातून फरार झाला होता. भारत सरकारकडून त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून 2018च्या जुलै महिन्यांत इंटरपोलने नीरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. दोनच दिवसांपूर्वीच नीरव मोदीच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. लंडनच्या न्यायालयाने नीरव मोदीच्या विरोधात हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment