विमान प्रवाशाच्या सामानामध्ये सापडला जिवंत मानवी गर्भ

embryo
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मलेशियन नागरिकाला विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून, या इसमाच्या सामाना मध्ये जिवंत मानवी गर्भ सापडला असल्याचे वृत्त आहे. ही धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे समजते. हा गर्भ एका खास डब्यामध्ये ठेवण्यात आला असून, मेलेशियामधून हा गर्भ भारतामध्ये आणला जात होता. या इसमाच्या सामानाची तपासणी केली गेल्यानंतर मानवी गर्भ असलेला विशिष्ट कंटेनर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हाती लागला असल्याचे समजते. संबंधित प्रवाशाला अटक केल्यानंतर केल्या गेलेल्या चौकशीमध्ये आपण याही पूर्वी अनेकदा जिवंत मानवी गर्भ आपल्या सामानामधून भारतामध्ये आणले असल्याची कबुली या प्रवाशाने दिली आहे.
embryo1
या संपूर्ण घटनेचा संबंध मुंबईतील एका आयव्हीएफ (in-vitro fertilisation) क्लिनिकशी असल्याचे म्हटले जात असून, या क्लिनिकमध्ये मानवी गर्भांची तस्करी केली जात असावी असा पोलिसांचा संशय आहे. संबंधित क्लिनिकच्या वतीनेमात्र या आरोपांचे खंडन करण्यात आले असले, तरी ज्या मलेशियन नागरिकाच्या करवी ही तस्करी करविली जात होती, त्याच्या मोबाईल फोनवर अनेक मेसेजेस सापडले असून, त्यावरून हा गर्भ मुंबईतील याच क्लिनिक मध्ये पोहोचविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे समजते. त्यावर आपल्या क्लिनिक चे नाव मलीन करण्यासाठी हे कारस्थान केले गेले असल्याचे क्लिनिकच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment