‘बुद्धाज् हँँड- उत्तर पूर्वी भारताची चविष्ट खासियत

hand
भारतामध्ये खानपानाच्या विविधतेबरोबरच यामध्ये वापरल्या जाणाऱ्या फळे व भाज्यांमध्येही विविधता दिसून येते. प्रत्येक राज्यासाठी ज्याप्रमाणे ठराविक भाज्या किंवा फळे खास आहेत, त्याचप्रमाणे उत्तर-पूर्व भारतातील राज्यांची खासियत असलेले ‘बुद्धाज् हँड’ हे फळ आहे. हे फळ लिंबासारखे असते, मात्र या फळाला ऑक्टोपसप्रमाणे अनेक हात (tentacles) असतात. म्हणूनच या फळाला ‘बुद्धाज् हँड’ म्हणण्यात येते.
hand1
भारताच्या उत्तर-पूर्वी भागामध्ये प्रामुख्याने आढळणारे हे फळ आहे. हे फळ मूळचे कुठे आहे याचा नेमका अंदाज वनस्पती तज्ञांना नसला, तरी हे फळ मूळचे भारतातील किंवा चीनमधील असावे असा तज्ञांचा कयास आहे. काहींच्या मतानुसार भारताच्या बाहेरून येथे आलेल्या बौद्ध भिक्षूंच्या समवेत हे फळ भारतामध्ये आले असावे. तसेच हे बौद्ध भिक्षु चीनलाही गेल्याने त्यांच्या समवेत हे फळ तिथेही जाऊन पोहोचले असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.
hand2
हे फळ चवीला लिंबासारखेच आंबट असून, याचा सुगंध मन प्रसन्न करणारा असतो. या फळाच्या रसाचा वापर अत्तरे आणि रूम फ्रेशनर्स म्हणून ही केला जातो. या फळामध्ये केवळ रस असून, या फळामध्ये गर नसतो. या फळाची साल लिंबाप्रमाणे कडू लागत नसल्याने या फळाच्या सालीचा देखील वापर पदार्थामध्ये करण्यात येतो. या फळाचे तुकडे पाकामध्ये घालून बनविलेली कॅन्डी चवीला उत्तम लागते.

Leave a Comment